दवंगे वस्ती शाळेत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
कोपरगाव लक्ष्मण वावरे दि .२५ आक्टोबर २०२५
कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दवंगे वस्ती ( मळेगाव थडी ) शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा सरपंच सारिका दवंगे यांच्या अध्यक्षतेखाली
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण घेतलेले अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. ज्या शाळेत आपला पाया घडला लिहायला वाचायला आपण शिकलो त्या शाळेविषयी बोलताना अनेक विद्यार्थ्यांना गहिवरून आले जुन्या आठवणी अनेकांनी बोलून दाखवल्या आणि त्या वेळची शाळा आणि आजची शाळा यात फार बदल झालेला विद्यार्थ्यांना दिसून आला शाळेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड संगणक वेगवेगळी शैक्षणिक साहित्य खेळाची साहित्य सीसीटीव्ही असल्याचे पाहून कौतुक केले. आणखीन शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी मदत करू अशा भावना विद्यार्थ्यांनी आपले मत मांडताना व्यक्त केल्या
मेळाव्याला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल दवंगे उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव दत्तू शिंदे,अमोल दवंगे,भारत जाधव, अनिल खोंड, नितीन खोंड,प्रसाद खोंड, राजेश शिंदे,वैभव जाधव, संतोष वाघ, शिवप्रसाद दवंगे, सुदर्शन कासार आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते मेळावा आनंदात संपन्न झाला मेळाव्याचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ मंडाळकर तर आभार श्रीमती अस्मिता भांगरे यांनी मानले.







