banner ads

चांगल्यांच्या सानिध्यात रहा, आपण यशस्वी व्हाल, - डॉ. मनाली कोल्हे

kopargaonsamachar
0

 चांगल्यांच्या सानिध्यात रहा, आपण यशस्वी व्हाल,  - डॉ. मनाली कोल्हे

 नितिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धांचे आयोजन

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
अपयश  आले तरी चालेल परंतु आपल्या कार्यात सातत्य ठेवा, मोठे स्वप्न बघा, आणि भविष्यात  चांगली शिक्षण संस्था निवडून आपले करीअर घडवा,सकारत्मक विचार ऐका, चांगल्यांच्या सानिध्यात रहा, आपण यशस्वी व्हाल, असे उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्सच्या संचालिका व संजीवनी महिला सक्षमीकरण मंचच्या संस्थापिका डॉ. मनाली अमित कोल्हे यांनी काढले.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांच्या ७३ व्या वाढदिवसा निमित्ताने संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी महिला सक्षमीकरण मंचच्या वतीने कोपरगांव तालुक्यातील इ.७ वी ते इ. १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन संजीवनी सोलर बन्क्वेट हॉल मध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. कोल्हे बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर मंचच्या अध्यक्षा प्रा. अपुर्वा यावले, खजिनदार डॉ. सरीता पवार व सर्व सदस्या उपस्थित होत्या.संजीवनी परीवाराने आपले प्रेरणा स्त्रोत  नितिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसा निमित्ताने सर्जनशील  उपक्रम राबवुन विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातुन विचारांचे आणि कल्पनांचे सुंदर चित्ररूप साकारले. या उत्साहाने ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांची कला दाखविण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले. यात सुमारे १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.प्रारंभी डॉ. पवार यांनी प्रास्तविक भाषणात संजीवनी शैक्षणिक  सकुलाची माहिती दिली.
डॉ. कोल्हे पुढे म्हणाल्या की  नितिनदादा कोल्हे यांची साधी राहणी व उच्च विचार सरणी आहे. त्यांचे नवीन पिढीवर विशेष  प्रेम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली  संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट  अमित कोल्हे यांनी संजीवनीच्या सर्व संस्था एका विशिष्ट  उंचीवर नेल्या आहेत. 
स्पर्धेतील चित्र काढण्यासाठी प्रदूषण  विरहित जग, माझ्या स्वप्नातील शाळा , कल्पनारम्य प्राणी, भारत: माझे स्वप्न, जी20, माझा सुपर हिरो, ऐतिहासिक घटना व वन्यजीव संरक्षण असे विषय  देण्यात आले होते.दोनही गटात प्रत्येकी प्रथम विजेत्यास रू ३०००, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, द्वीतिय विजेत्यास रू २०००, मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतिय विजेत्यास रू १००० , मानचिन्ह व प्रमाणपत्र अषी बक्षिसे होती. तसेच रू ५०० ची दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही होती.

विजेते पुढील प्रमाणे. कंसात शाळा /ज्यु. कॉलेजचे नाव आहे. गट- इ.७वी आणि ८वी. स्वरूप बाळक्रिष्ण  मांढरे-प्रथम (आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल), दर्शन  महेश शिंदे -द्वीतीय (गुरूदत्त इंग्लिश  मीडियम स्कूल), जयेश  सुर्यवंशी  -तृतिय (आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल), योग राजपुत -उत्तेजनार्थ (समता इंटरनॅशनल स्कूल), सविना पावरा (आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल).इ. ९ वी ते इ. १२ वी गट-गिरीजा कृष्णा  लोहोकरे-प्रथम (आत्मा मालिक इंग्लीश  मीडियम स्कूल गुरूकूल), सिध्दांत क्रिश्णा रोहकले -द्वीतिय ( आत्मा मालिक इंग्लीश  मीडियम स्कूल गुरूकूल ), प्रणय विनायक गायकवाड-तृतिय (समता इंटरनॅशनल स्कूल), श्रध्दा अशोक  चौधरी -उत्तेजनार्थ (जी.टी.बी. विद्यालय), तनुश्री राहुल उगले -उत्तेजनार्थ (शिवशंकर  विद्यामंदीर). संजीवनीचे कला शिक्षक  मतिन दारूवाला व बाबा सुर्यवंशी  यांनी परीक्षक म्हणुन काम पाहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!