रयत संकुल’ कोपरगाव शहर यांच्या वतीने ‘कर्मवीर जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंती निमित्त सोमवार दि.२२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वा. एम.के. आढाव विद्यालय ते एस. एस. जी. एम. महाविद्यालय पदयात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच मंगळवार दि.२३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा. एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या डॉ. होमी भाभा प्रांगणात ‘कर्मवीर जयंती’निमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे तर प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (प्रसिद्ध लेखक,वक्ता) हे प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून लाभणार आहेत उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला आमदार आशूतोष काळे सदस्य- महाराष्ट्र विधानसभा., अध्यक्ष - उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था सातारा, . अशोकराव काळे,. बिपिनदादा कोल्हे, पद्माकांत कुदळे, कारभारी आगवन,मच्छिंद्र रोहमारे. बाळासाहेब कदम, अरुण चंद्रे,.ॲड संदीप वर्पे सदस्य,जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, . सौ. चैताली काळे, विवेक कोल्हे, . महेंद्रकुमार काले, . बाळासाहेब आव्हाड, डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.
बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण ठेवण्यासाठी आज महाराष्ट्रभर कर्मवीर जयंती साजरी केली जाते आहे. सदर कार्यक्रम मंगळवार दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा होत आहे. हा समारंभ श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कोपरगाव, पद्मा मेहता प्राथमिक विद्यामंदिर कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.
या कार्यक्रमासाठी रयत प्रेमी व ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माधव सरोदे, मुख्याध्यापिका सौ. अनिता धनक, मुख्याध्यापक. काशिनाथ लव्हाटे, मुख्याध्यापक . सुभाष दरेकर, मुख्याध्यापक . शिवाजी लंके, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. संतोष पवार यांनी केले आहे.






