शहराचा चेहरा-मोहरा बदलुन नागरीकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध ---- आ.आशुतोष काळे
विकासकामांचे आ. काळें च्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नागरीकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा, पायाभूत रचना आणि नागरी गरजांनुसार प्रत्येक प्रभागात ठोस कामे हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शासनदरबारी अनेक प्रस्ताव दाखल केले असून त्या प्रस्तावांना लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. कोपरगाव शहराच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोपरगाव शहराचा सर्वांगीण आणि समतोल विकासासाठी प्रत्येक प्रभागाचा नियोजनबद्ध विकास केला जाईल शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी आणि नागरीकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली .

कोपरगाव शहरातील प्रभाग क्र.०५ मध्ये ५१.५७ लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. या विकास कामांमध्ये सूर्यकांत कहार घर ते अजय लचुरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे,बिलाल शेख घर ते धुमाळ सर घर ते डंबीर दुकानापर्यंत पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रामदास लकारे घर ते विलास भांगरे घरापर्यंत भूमिगत गटार करणे, अंबिका भोजनालय ते सागर भगत घरापर्यंत भूमिगत गटार करणे, राहुल देवळालीकर घर ते वेसपर्यंत भूमिगत गटार करणे, श्री मारुती मंदिर ते नरोडे रेशन दुकानापर्यंत भूमिगत गटार करणे, दारुंटे घर ते दत्तपारपर्यंत भूमिगत गटार करणे,माळी काकू घर ते रिंकू खडांगळे घरापर्यंत भूमिगत गटार करणे आदी कामांचा समावेश आहे.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की महायुती सरकारच्या माध्यमातून, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांचं सहकार्य घेऊन आवश्यक निधी आणण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे. कुठल्याही प्रभागाच्या विकासात दुजाभाव होणार नाही. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. कोपरगाव शहराच्या विकासासाठी निश्चित आराखडा तयार करून, प्रत्येक प्रभागाचा समतोल आणि नियोजनबद्ध विकास करण्याचा माझा निर्धार असून कोपरगावकरांच्या आशीर्वादाने तो निश्चीतपणे पूर्ण करील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.