banner ads

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत संजीवनीच्या समर सैनीची नेत्रदिपक खेळी

kopargaonsamachar
0

 

राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत संजीवनीच्या समर सैनीची नेत्रदिपक खेळी


संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात मत्त्वपूर्ण योगदान  
कोपरगांव  ( लक्ष्मण वावरे )
  संजीवनी अकॅडमीच्या समर रघुबीर सैनीने सीबीएसई राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत दक्षिण विभागाचे प्रतिनीधीत्व करीत आपल्या संघाला कांस्य पदक मिळवून देण्यात मोलाची कामगीरी बजावली.

              नोएडा येथील आस्टर पब्लिक स्कूल मध्ये हि स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.  
        याबाबत माहिती देताना संजीवनी ग्रुप ऑफ  स्कुलच्या संचालिका डाॅ.मनाली कोल्हे म्हणाल्या, या स्पर्धेत देशभरातून दहा विभातील संघ सहभागी झाले होते. दक्षिण विभागात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांचा समावेश होता. सैनीने आपल्या उल्लेखनीय कामगीरी करीत आपल्या संघाला तृतीय क्रमांक मिळवून दिला. संजीवनी अकॅडमी मध्ये शैक्षणिक  बाबींबरोबरच खेळाला महत्व दिले जाते.अनुभवी प्रशिक्षकांमुळे हे यश मिळते आहे. तीन राज्यातुन सैनीची दक्षिण विभागाच्या संघात निवड झाली. त्याने आपली निवड सार्थ ठरवीली याचा आम्हाला अभिमान वाटतो. त्याला क्रिकेट मध्ये करिअर करायचे असल्यास संस्था त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील. संस्थेचे अध्यक्ष  नितिन कोल्हे, कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे,  प्राचार्या शैला  झुंजारराव व प्रशिक्षक कृष्णा  सुरासे यांनी सैनीचे अभिनंदन केले.

 संजीवनी अकॅडमीतील माझे शिक्षक आणि प्रशिक्षक यांच्यामुळे मला क्रिकेट खेळण्याची आवड जोपासता आली. या स्पर्धेत माझी कामगीरी उत्तम झाली. त्यामागे प्रशिक्षकांनी माझ्यावर घेतेलेली मेहनत आणि मी केलेला कसून सराव कारणीभूत आहे. हे एका अर्थाने संजीवनी अकॅडमीचेच यश आहे.

-              समर सैनी 
 ( 
संजीवनी अकॅडमी, कोपरगाव)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!