banner ads

येसगाव जवळील अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी

kopargaonsamachar
0

 येसगाव जवळील अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी 


जखमीवर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव - येवला रोडवर येसगाव जवळील डाव्या कालव्या जवळ कोपरगाव कडून येवल्याकडे जात असलेल्या टाटा मेघा गाडी नंबर MH - 45 AF-2161 या चार चाकी गाडी ने रोड च्या कडेला उभ्या असलेल्या दोघांना जोराची धडक दिल्याने झालेल्या या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला तर टाटा मेघा गाडी रोडच्या कडेला असलेल्या नालीत पलटी झाली गाडीत पंधरा ते वीस तरुण होते हा अपघात रविवार (ता.२१ ) रोजी रात्री ८ ते ८.३० वाजे दरम्यान घडला.
                         
 याबाबत अधिक माहिती अशी की नवरात्र उत्सवा निमित्त सप्तशृंगी गडावरून ज्योत आणण्यासाठी नेवासा येथील कार्यकर्ते वाहनांमधून जात असताना कोपरगाव येवला रोडवर येसगाव जवळील डाव्या कालव्या जवळ कामावरून घरी पायी चाललेल्या दत्तात्रय महादू शेलार  ( वय 36 ) रा.  खिर्डी गणेश ता कोपरगाव व कालव्याच्या पुढे रोडच्या कडेला आपली गाडी नादुरुस्त झाली म्हणून उभ्या असलेल्या नाना रंगनाथ दराडे ( वय 40 ) रा.बाजीरावनगर येवला या दोघांना जोराची धडक दिली या धडकेत हे दोघेही गंभीर जखमी झाले तर माणसांनी भरलेली टाटा मेघा गाडी रोडच्या कडेला असलेल्या नालीत पलटी झाली अपघाताच्या आवाजाने परिसरातील  नागरिक गोळा होत गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढले ते किरकोळ जखमी होते तर गंभीर जखमी झालेल्या नाना दराडे यांना शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात रूग्णवाहीकेतुन नेण्यात आले.
                      
 उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले तर दुसरे जखमी शेलार यांना कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात व त्यानंतर लोणी येथे उपचारासाठी नेण्यात आले.दरम्यान कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!