banner ads

नामदेवराव परजणे पाटील विरंगुळा पार्कचे ज्येष्ठ नागरीकांसाठी लोकार्पण

kopargaonsamachar
0

 नामदेवराव परजणे पाटील विरंगुळा पार्कचे ज्येष्ठ नागरीकांसाठी लोकार्पण



कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगांव शहरातील वयोवृध्द व ज्येष्ठ नागरीकांसाठी शहरातील इंदिरापथ रस्त्यावर उभारण्यात आलेल्या नामदेवराव परजणे पाटील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा पार्कचे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्या संकल्पनेतून शहरातील इंदिरापथ रस्त्यावर नामदेवराव परजणे पाटील ज्येष्ठ नागरीक विरंगुळा उद्यान विकसित करण्यात आले असून या उद्यानात वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष तसेच फुलझाडी लावण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरीकांना सकाळ सायंकाळ वेळ घालवता यावा यासाठी बसण्यासाठी बाकांची सोय करण्यात आलेली आहे. बालकांना खेळण्याच्या साहित्याची देखील लवकरच सोय केली जाणार आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे उद्यान असल्याने ज्येष्ठ व वयोवृध्द नागरीकांना उर्वरीत आयुष्यातले काही क्षण निवांतपणे या उद्यानात घालविता येणार आहेत.
लोकार्पण सोहळ्यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, जिल्हा शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले,  कोपरगाव पालिकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, गटविकास अधिकारी संदीप दळवी, पंडीत वाघिरे, बाळासाहेब साबळे, उत्तमराव पवार, दत्तुनाना कोल्हे, डॉ. मुळे, डॉ. आचारी, डॉ. भांडगे, ॲड. मनोज कडू, नानासाहेव सिनगर, संदीप चव्हाण, योगेश जोबनपुत्रा, संजय भनसाळी, राजेंद्र शिरोडे, रवींद्र लोहाडे, जितेंद्र गंगवाल, सचिन अजमेरे, कल्पेश शहा, मनिष शहा, अजित कोरके, शामकर्ण होन, सतीश गुजराथी, रविंद्र आढाव, राहूल आढाव, उत्तमभाई शहा, मंगेश पाटील, गणेश आढाव, आंबादास वडांगळे, वसंतराव जाधव, विनायक गायकवाड, भास्करराव डुकळे, नामदेव शिंदे, विवेक परजणे, जगदीप रोहमारे, गोरक्षनाथ शिंदे, सुदामराव शिंदे, भिकाजी झिंजुर्डे, सुदामराव कोळसे, संजय टुपके, सोपान चांदर, सीताराम कांडेकर, यशवंतराव गव्हाणे, खंडू फेपाळे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव साबळे, चंद्रकांत लोखंडे, लक्ष्मणराव परजणे, शंकरराव परजणे, विजय परजणे, गोदावरी दूध संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, कॉन्ट्रॅक्टर कैलास भुतडा, सुनील कुन्हाडे, राजेंद्र शिंदे, सचिन आढाव यांच्यासह शहर व तालुक्यातील अनेक नागरीक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!