banner ads

संजीवनी इंटरनॅशनलच्या राजविका कोल्हे आणि तन्वी गोंदकर यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार...

kopargaonsamachar
0

 संजीवनी इंटरनॅशनलच्या  राजविका कोल्हे आणि तन्वी गोंदकर यांना   आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार



कोपरगांव, ( लक्ष्मण वावरे )
शिर्डी येथील  संजीवनी इंटरनॅशनल स्कूलच्या  अकरा विद्यार्थ्यांनी बेंगळूर येथील जैन इंटरनॅशल स्कूलने आयोजीत केलेल्या मॉडेल युनायटेड नेशन्स (एमयुएन) या  आंतरराष्ट्रीय  स्पर्धेत सहभाग नोंदवीला.  प्रतिभा संपन्नता आणि सफाईदार देहबोलीचे दर्शन  घडवित त्यातील दोन विद्यार्थ्यींनींनी उत्कृष्ट प्रतिनीधीत्व पुरस्कार प्राप्त केला. त्यात राजविका अमित कोल्हे आणि तन्वी अतुल गोंदकर यांचा समावेश आहे. अशी माहिती संस्थेच्या संचालिका डाॅ.मनाली कोल्हे यांनी दिली.

      त्या म्हणाल्या, या सातव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत लिटरेचर चाप्टर एक्स या कमिटी अंतर्गत राजविकाने ‘अनाबेथ चेस’ यांची भूमिका  साकारली.  तन्वीने मेडूसाची भूमिका साकारली. या दोघींच्या भूमिका लक्षवेधी ठरल्याने त्यांना वरील पुरस्कार मिळाला.
    या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संयुक्त राष्ट्र  संघातील विविध देशांच्या प्रतिनिधींच्या भूमिका साकारल्या.  ‘युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्ज’, ‘युनायटेड नेशन्स हुमन राईटस् कौन्सिल’,  ‘डिसार्मामेंट अँड  इंटरनॅशनल सिक्युरिटी कमिटी’ अशा ज्वलंत  विषयांवर विचार मांडले. त्यात  सिध्दी तांबे (जर्मनी) , अद्वैता पानगे (जपान) , सुरभी जगताम (आर्मेनिया),  वीरा विखे  (अझेरबैजन) , मीत कोळी (अलबेनिया), शाश्वत  कुमार ( ब्राझील) , रितिका गोंदकर ( रिपब्लिक ऑफ चिले ) , अद्वैत फोपसे (जपान) , भूवी कोठारी ( इंडोनेशिया) या विविध देशांचे  प्रतिनिधित्व करील  वरील  विषयावर आपले  विचार प्रभावीपणे मांडले.

     संजीवनी शैक्षणीक संकुलाचे अध्यक्ष नितिन कोल्हे, कार्यकारी  अमित कोल्हे यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी डायरेक्टर ऑफ स्कूल ऑडीट अँड  कम्प्लायंसेस सुंदरी सुब्रमण्यम, प्राचार्या रीना राजपुत, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके आदि उपस्थित होत्या.

   एमयुएन हा एक शैक्षणिक  उपक्रम आहे. त्यात  विद्यार्थी वेगवेगळ्या देशांचे  प्रतिनिधींची भुमिका साकारून, हवामान बदल, दहशतवाद, मानवाधिकार, गरीबी, आरोग्य या समस्यांवर चर्चा, वादविवाद, वाटाघाटी, करून त्यावर उत्तर शोधतात. त्यातून विद्यार्थ्यांचे भाषण  कौशल्य, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समुह कार्यपध्दती, , जागतिक दृष्टिकोन विकसीत होतो. यंदा पाचशेहून अधिक स्पर्धकांतून संजीवनी इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी हि चमकदार कामगीरी केली. हि कौतुकास्पद बाब आहे. 
-----डॉ. मनाली कोल्हे, संचालिका, संजीवनी ग्रुप ऑफ स्कूल्स.  

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!