banner ads

संजीवनी युवा प्रतिष्ठान कुंभमेळ्यात सर्व पर्वणी दिमाखदार साजऱ्या करणार

kopargaonsamachar
0

 संजीवनी युवा प्रतिष्ठान कुंभमेळ्यात सर्व पर्वणी दिमाखदार साजऱ्या करणार


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )


श्रावण महिन्यात गंगा-गोदावरी महाआरती दर सोमवारी आयोजित करण्याची परंपरा यंदाही मोठ्या दिमाखात पार पडली. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवानेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली रंगबेरंगी रोषणाई, मधुर संगीत, हजारो दिव्यांची आरास, फटाक्यांची आतिषबाजी आणि हजारो भाविकांच्या सहभागात भगवान शंकर महादेव व गोदामातेची आरती झाली. डोळ्यांचे पारणे फेडणारे हे अध्यात्मिक दृश्य कोपरगावकरांच्या हृदयात कायमचे कोरले गेले.

संस्कृती जतनासोबतच युवकांना वैचारिक दिशा देणारे शेकडो उपक्रम संजीवनी युवा प्रतिष्ठान वर्षभर आयोजित करत असते. नुकत्याच एक राखी जवानांसाठी या उपक्रमांतर्गत सव्वा लाखाहून अधिक राख्या सीमेवरील सैनिकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या. शिर्डी ते श्रीनगर अशी काढलेली राखी यात्रा विशेष दखलपात्र ठरली. अशाच सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय उपक्रमांमुळे प्रतिष्ठानची कार्यशैली जनमानसात आदर्शवत ठरली आहे.

गंगा आरतीच्या प्रसंगी जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत रमेशगिरी महाराज यांनी अध्यात्मिक कार्यासाठी प्रतिष्ठानचे कौतुक केले. विवेकभैय्या कोल्हे यांनी युवकांना आदर्श दिशा देणारे कार्यक्रम आयोजित केले आहे त्याबद्दल कौतुक केले. आत्मा मालिक ध्यानपीठाचे महंत परमानंद महाराज यांनी धर्मसत्ता व राजसत्ता यांचे अधिष्ठान विषद करत कोपरगावात होणाऱ्या या स्तुत्य उपक्रमांना भविष्यातील कुंभमेळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. गोदाघाटावर नव्याने घाट उभारणी व्हावी, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या मनोगतात आगामी कुंभमेळ्याच्या सर्व पर्वणी महाआरत्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भव्य प्रमाणावर आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. गंगा-गोदावरी स्वच्छ ठेवत तिला प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी बिपीनदादा कोल्हे, रेणुकाताई विवेक कोल्हे, तसेच अहमदाबाद येथून आलेले साई मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ॲड. बालकृष्णभाई, गिरीशभाई, अहमदभाई, घनशामभाई यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. कोपरगाव नगरपरिषद, पोलिस प्रशासन व पत्रकार बांधव यांचे सहकार्य या उपक्रमास मोलाचे लाभले. कोपरगावच्या गंगा-गोदावरी घाटावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेली ही आरती केवळ धार्मिक उत्सव नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा अनुपम सोहळा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!