banner ads

एस.एस.जी.एम महाविद्यालयातून शिक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी. - प्राचार्य डॉ. माधव सरोदे

kopargaonsamachar
0

 एस.एस.जी.एम महाविद्यालयातून शिक्षण म्हणजे  उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी. - प्राचार्य डॉ. माधव सरोदे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

 “नॅककडून  ३.६९ मानांकनासह A++ श्रेणी मिळवलेले श्री सदगुरू गंगागीर महाराज कॉलेज, हे देशातील निवडक कॉलेजातील गुणवत्ता मिळविलेले एक महाविद्यालय आहे. त्यामुळे आपण अशा महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे की, त्यात आपले उज्ज्वल भविष्य घडविण्याची संधी प्राप्त झाली आहे.” असे   प्रतिपादन प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. 

ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे आयोजित प्रथम वर्ष बी. एस्सी आणि बी.सीएस वर्गाच्या  स्वागत समारंभ  प्रसंगी बोलत होते. आपल्या मनोगतात त्यांनी, “विद्यार्थ्यांना उत्तम यशासाठी अध्यापन करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,  शिक्षक आणि प्रशासन यंत्रणा कायम सहकार्य करण्यासाठी कायम तत्पर असतात.  ज्ञानार्जनाबरोबरच विद्यार्थ्यांनी कॉलेज शिस्तीचे पालन करावे. नेहमी ओळखपत्र आणि गणवेशात उपस्थित राहावे. महाविद्यालयीन मालमत्तेचे जतन  व संवर्धन करावे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये. कॉलेजमधून शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी जीवनाचा वैयक्तिक विकास साधावा.शिक्षणाबरोबरच आपले करिअर घडवणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी   AI प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात  रयत शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे, त्याचाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.”असे सांगितले.  यावेळी सदर  कार्यक्रमात विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु.साक्षी शिंदे, कु.श्रद्धा घुले,कानडे शर्वरी व चि.मयूर काकडे  या विद्यार्थ्यांनी  आपले मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर प्राचार्यांच्या शुभहस्ते विज्ञान शाखेतील नवप्रवेषित विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी विविध विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांना आपल्या विभागांची व उपक्रमांची माहिती दिली; त्यात प्रामुख्याने आय.क्यू. ए. सी. विषयी विस्तृत माहिती प्रा. डॉ. एन. व्ही. मालपुरे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर प्रा. डॉ. ए. बी. भागवत, विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती डॉ.रंजना वर्दे, विद्यार्थी विकास मंडळाविषयी प्रा. डॉ. एम. आर. यशवंत, परीक्षा विभागाविषयी प्रा. एस. डी. रणधीर, स्पर्धा परीक्षेविषयी प्रा. ए. पी. इंगळे, शॉर्ट टर्म कोर्सची माहिती प्रा. रणदिवे टी.वाय., संशोधन विभागाविषयी प्रा. डॉ. व्ही. एल. गाढे, राष्ट्रीय सेवा योजने विषयी प्रा. डॉ. बी. ए. तऱ्हाळ, सांस्कृतिक विभागाची माहिती प्रा. डॉ. एस. पी. पवार, तसेच एन.सी.सी. विभाग प्रा. डॉ. एस. बी. चौधरी, ग्रंथालय प्रा. सी. टी. खैरनार, जिमखाना विभाग प्रा. डॉ. व्ही. एस. पवार तक्रार निवारण डॉ. एस.आर. दाभाडे या सर्वांनी आपापल्या विभागाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध सेवा आणि सुविधा  समजावून सांगितल्या.
सदर कार्यक्रमासाठी  शास्त्रशाखेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख,  विज्ञान  शाखेतील सर्व प्राध्यापक   यांसह  शास्त्र शाखेतील नवीन प्रवेशित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत व प्राचार्यांचा परिचय शास्त्रशाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार प्रा. सुभाष सैदंणशिव यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. प्रियंका पवार, प्रा. लोढा यांनी केले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!