banner ads

श्रेय घ्यायचे सोडाच पण त्यावर प्रतिक्रिया देणे सुद्धा हास्यास्पद -नंदकिशोर औताडे

kopargaonsamachar
0

 श्रेय घ्यायचे सोडाच पण त्यावर प्रतिक्रिया देणे सुद्धा हास्यास्पद -नंदकिशोर औताडे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 ज्यांना पाच वर्ष आमदारकी समजण्यातच गेले त्यामुळे त्यांना जनतेच्या समस्या आणि अडचणी काय आहेत हे कधी समजलेच नाही. त्यांनी पोहेगाव व जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनला जोडण्यावर श्रेय घ्यायचे तर सोडाच पण त्यावर प्रतिक्रिया देणे सुद्धा हास्यास्पद आहे.त्यापेक्षा ज्या व्यक्तीचा पोहेगाव व जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनला जोडण्याशी काडीमात्र संबंध नाही अशा व्यक्तीच्या नावाने प्रेस नोट काढून त्यांनी त्यांच्या बुद्धीचे दिवाळे काढले आहे. विरोधकांची हि वायफळ बडबड म्हणजे निवडणुका आल्या, जनतेने काय ते समजून घ्यावे अशी मार्मिक टीका पोहेगावचे मा.ग्रा.सदस्य नंदकिशोर औताडे यांनी मा.आ.कोल्हे यांच्यावर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे गटातील पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे शिर्डी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असल्यामुळे नागरीकांना सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरीकांना येणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी सलग पाच वर्ष सातत्याने शासन दरबारी केलेल्या पाठपुराव्यातून पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात आली आहे. परंतु कुठे तरी आपण प्रवाहाच्या बाहेर तर लोटले जाणार नाही ना? ह्या भीतीपोटी कोल्हे गटाने त्यांच्या कार्यकर्त्याचा याबाबत कुठलाही संबंध नाही अशा कार्यकर्त्याच्या नावे प्रेसनोट देवून टीका केली होती त्या टीकेचा अतिशय मुद्देसूद आणि मार्मिक शब्दात समाचार घेतांना नंदकिशोर औताडे यांनी मा.आ.कोल्हेंना खडे बोल सुनावले आहे.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात औताडे यांनी पुढे असे म्हटले आहे की,२०२० पासून आ.आशुतोष काळे यांनी शिर्डी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेली पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात घ्यावी याबाबत आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु होता. हा प्रश्न तातडीने मार्गी लागावा यासाठी जुलै २०२० मध्ये तात्कालीन गृहमंत्री ना.अनिलजी देशमुख यांना देखील निवेदन दिले होते. त्यानंतर सप्टेबर २०२२ मध्ये आ.आशुतोष काळे यांनी तात्कालीन गृहमंत्री व सध्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी निवेदन दिले होते. त्या निवेदनात संबंधित गावांनी त्याबाबत ठराव मंजूर केला असून शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी ठरावाच्या संमती पत्रासह अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत पोलीस महासंचालक कार्यालयाकडे सदरचा अहवाल सादर केला असल्याचे नमूद करून त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही व्हावी अशी विनंती केली. त्यावेळी ना.देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश गृह विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. आ.आशुतोष काळेंच्या अशा अथक पाठपुराव्याला मूर्त रूप येवून शिर्डी पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेली पोहेगाव खु.,पोहेगाव बु.व जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात घेण्यात आली आहेत.
याबाबत या गावातील नागरीकांना चांगलेच माहिती आहे की,आ.आशुतोष काळे यांनी कशा पद्धतीने पाठपुरावा केला आहे. परंतु एवढा खुलासा करण्याचे कारण एवढेच की, खोटे बोल पण रेटून बोल हि ज्यांची सवय आहे. त्यांना जिकडे तिकडे फक्त आणि फक्त श्रेयच दिसते.त्यामुळे आपला कुठेही काडीचा संबंध नसतांना देखील हे आमच्यामुळेच झाले असे बोलून मोकळे व्हायचे आणि जनतेची दिशाभूल करायची हि त्यांची जुनीच सवय आहे. त्यामुळे त्यांच्या आरोपांना आणि केलेल्या टीकेला जनता देखील सिरीयस घेत नाही त्याकडे मनोरंजन म्हणून पाहते असे पोहेगावचे मा.ग्रा.सदस्य नंदकिशोर औताडे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.  

 विरोधक एवढे सैरभैर झाले आहेत की, त्यांना प्रेसनोट कुणाच्या नावाने द्यायची याचे सुद्धा भान राहीले नाही.ज्या कार्यकर्त्याच्या नावे टीकेची प्रेसनोट दिली आहे तो कार्यकर्ता कुंभारी गावचा नागरिक आहे. त्याचा आणि पोहेगाव,जवळके हि गावे कोपरगाव पोलीस स्टेशनला असो किंवा शिर्डी पोलीस स्टेशनला त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. ह्या कार्यकर्त्याच्या दैनंदिन वापरात असणारा कुंभारी-मढी रस्ता त्यांची सत्ता असतांना त्यांच्याच नेत्याने नकाशावरच नसल्याचे सांगितले होते.त्याच रस्त्याला आ.आशुतोष काळे यांनी ६.०९ कोटी निधी दिला असून हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून विकासकामे करणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्यावर टीका करण्यासाठी आपला कुठलाही संबंध नसतांना आपल्या नावाचा करण्यात आलेला वापर या कार्यकर्त्याला सुद्धा खटकला असणार आहे. 
-नंदकिशोर औताडे.

    
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!