banner ads

राष्ट्रवादी च्या ‘अविरत विकासाची दहीहंडी चे" पदाधिकारी जाहीर

kopargaonsamachar
0

राष्ट्रवादी च्या ‘अविरत विकासाची दहीहंडी चे" पदाधिकारी जाहीर 


आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी कोपरगाव शहरात होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवाला प्रचंड प्रतिसाद मिळतो. हा उत्सव गेली अनेक वर्षे तालुक्यातील एक लोकप्रिय आणि भव्य सांस्कृतिक पर्व म्हणून ओळखला जात आहे. गोविंदा पथकांचा उत्साह, भव्य सजावट, तसेच आकर्षक सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे राष्ट्रवादीच्या दहीहंडीला मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते व तालुक्याभरातून नागरिक या दहीहंडी उत्सवात सहभागी होतात. दरवर्षी गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी नामवंत कलाकारांची उपस्थिती, शिस्तबद्ध आयोजन आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवाची ख्याती दिवसेंदिवस वाढत आहे. याहीवर्षी राष्ट्रवादी काँग्रेसच्या होणाऱ्या ‘अविरत विकासाची दहीहंडी’ उत्सव सोहळा २०२५ चे असेच भव्य दिव्य नियोजन करण्यात आले असून या दहीहंडी उत्सवाची जबाबदारी कार्यकर्त्यांकडे देण्यात आली असून पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.


  यामध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी शुभ काळे यांच्याकडे देण्यात आली असून कार्याध्यक्षपदी राहुल चवंडके व राहुल शिरसाठ तर उपाध्यक्षपदी साजिद शेखतन्मय साबळे व योगेश शेलार, यांची निवड करण्यात आली आहे. तर खजिनदारपदी  मयूर राऊतसदस्यपदी रहेमान कुरेशीरोशन शेजवळविजय नागरेहर्षल जैस्वालकार्तिक सरदारसंतोष दळवीनितीन शेलारसुनिल वैरागळऋषिकेश खैरनारओम आढावदादा पोटेशिवाजी लकारेसंकेत कहारप्रसाद रुईकरसोमेश शिंदेमोहसिन शेखरवी शिंदेप्रदीप थोराततेजस गंगुलेआण्णा मासाळपरवेज शेखपवन राऊततेजस साबळेअभिषेक कोकाटेशुभम लासुरेहरीश वाकचौरेअमेय आढावअमीर पठाणशफिक शेखयुसुफ शेखयुवराज शिरसाठवसीम शेखविवेक फंडसागर गायकवाडअसलम शेखअथर्व कांबळेतालिक शेखयोगेश शेलार,शुभम जोशी यांची निवड करण्यात आली आहे.  

या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. दहीहंडी हा सण केवळ धार्मिक श्रद्धेचा नाही, तर सामाजिक ऐक्य, युवकांच्या संघटनशक्तीचा आणि सांस्कृतिक परंपरांचा एक सुंदर मिलाफ आहे. आपण केवळ एक सण साजरा करत नाही, तर समाजाला एक ऊर्जा देत आहोत. त्यामुळे प्रत्येक आयोजनात जबाबदारी, सजगता आणि आदर्श निर्माण करणारा दृष्टिकोन ठेवा. सण साजरे करतांना केवळ उत्सवाची धूम नव्हे, तर समाजहिताचाही विचार केला पाहिजे. दहीहंडी हा तरुणांचा सण असून, यातून सामाजिक एकता, शिस्त आणि संघभावनेचा संदेश गेला पाहिजे. सणांचा उद्देश केवळ करमणूक नसून, त्यातून संस्कार आणि समाजप्रबोधनही घडले पाहिजे. दिलेली जबाबदारी प्रत्येक पदाधिकारी चोखपणे पार पाडतील आणि  यशस्वी व भव्य दिव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन कोपरगावकरांना पुन्हा एकदा निश्चितच पाहायला मिळेल अशा शब्दात आ.आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांना त्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांचा उत्साह द्विगुणीत केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रसेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक वकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                            

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!