banner ads

आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर म्हस्के यांची अनोखी भेट

kopargaonsamachar
0

 


आ. आशुतोष काळेंच्या वाढदिवसानिमित्त 
चंद्रशेखर म्हस्के यांची अनोखी भेट 

सामाजिक भान ठेवणारा उपक्रम -- आ.आशुतोष काळे 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मेडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांच्या पुढाकारातून कोपरगाव शहरात एक वेगळा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून कोपरगाव नगरपरीषदेला दोन ‘निर्माल्य कलश’ भेट देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.१२) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते या निर्माल्य कलशांचे लोकार्पण करण्यात येवून त्याची जबाबदारी कोपरगाव नगरपरिषदेकडे देण्यात आली.यावेळी या उपक्रमाबद्दल आ.आशुतोष काळे यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक करतांना ‘निर्माल्य कलश’ श्रद्धा, स्वच्छता व संवेदनशीलतेचा  प्रतीक असल्याचे म्हटले आहे.

यावेळी आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, हिंदू धर्मात वर्षभर अनेक सण-उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक सणाच्या वेळी पूजा अर्चा केली जाते. त्यावेळी अर्पण केलेली फुले, तांदूळ, हार-दूर्वा यासारख्या गोष्टी म्हणजेच निर्माल्य उरते. या निर्माल्यामागे भक्ती, श्रद्धा आणि पावित्र्य असते. पण पूजा झाल्यावर हेच निर्माल्य जेव्हा रस्त्यावर, कोपऱ्यात, नाल्यात किंवा थेट नद्यांमध्ये टाकले जाते, तेव्हा श्रद्धेचं हे रूप प्रदूषणाचं कारण बनतं. ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त असा अभिनव उपक्रम राबविला हे खरोखर कौतुकास्पद आहे. श्रद्धा ठेवायचीच, पण ती निसर्गाच्या मर्यादा लक्षात घेऊन हि या उपक्रमाची असलेली भावना अत्यंत उदात्त असून श्रद्धा जपून निसर्गावर प्रेम करणारी आहे. धार्मिक विधीतील निर्माल्य ही श्रद्धेची, भक्तीची साक्ष असते. पण त्याच वेळी, निसर्गाशी आपला सुसंवाद टिकवण्यासाठी त्याचे शास्त्रीय व्यवस्थापन करणे तेवढेच गरजेचे आहे. या कलशाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी श्रद्धा आणि पर्यावरण यांचा सुंदर संगम साधला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी सोशल मेडिया सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर म्हस्के यांनी सांगितले की, ‘निर्माल्य कलश भेट’ ही एक सामाजिक जाणीव, पर्यावरणाबद्दलची बांधिलकी आणि श्रद्धेच्या व्यवस्थापनाची सुबोध दिशा आहे आणि या दिशेने जाण्यासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आ. आशुतोष काळे यांच्याकडून प्रेरणा मिळते. त्याच प्रेरणेतून आज कोपरगाव नगरपरिषदेला दोन निर्माल्य कलश भेट दिले. हा आमच्यासाठी केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर एक मूल्याधारित जबाबदारी आहे. हा उपक्रम नगरपरिषदेच्या सहकार्याने यशस्वी व्हावा, आणि पुढे कोपरगावचं नाव ‘स्वच्छ, सुंदर, सुसंस्कृत शहर’ म्हणून घेतलं जावं या उद्देशातून कोपरगावचा एक जबाबदार नागरिक व आ.आशुतोष काळे यांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून माझ छोटसं कर्तव्य मी बजावलं आहे.
यावेळी मुख्याधिकारी सुहास जगताप, स्वच्छतादूत सुशांत घोडके, गोदामाई प्रतिष्ठाणचे आदिनाथ ढाकणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

माझ्या वाढदिवसानिमित्त एवढा विचारपूर्वक, सामाजिक भान ठेवणारा उपक्रम माझ्या कार्यकर्त्यांनी राबवावा, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. निर्माल्य ही केवळ पूजेनंतर उरलेली साहित्य नाही तर तो भक्तीचा अवशेष आहे. या निर्माल्याचा पर्यावरणपूरक पुनर्वापर करण्यामागे पवित्रता आणि जागरूकतेचा संदेश या माध्यमातून दिला आहे. पर्यावरण रक्षण, सामाजिक जबाबदारी, आणि धार्मिक पवित्रतेचा एकत्रित संदेश देणारा हा उपक्रम आदर्श निर्माण करणारा आहे
. -आ.आशुतोष काळे.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!