राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन--मुकुंद मामा काळे
कोपरगाव (प्रतिनिधी)
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (७५०व्या) जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या महान संतपरंपरेला उजाळा देत आणि नवसर्जनशील प्रतिभेला वाव देण्यासाठी श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व कवी-कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रथम क्रमांक- ₹३००१, द्वितीय क्रमांक- ₹२००१ , तृतीय क्रमांक- ₹१००१ तसेच तीन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी- ₹५०१ व सहभागी सर्व स्पर्धकांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धा नि:शुल्क असून 'संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज 'या विषयावरील स्वरचित काव्यरचना दिनांक २० ऑगस्ट २०२५ पर्यंत
विशाल रघुनाथ गडगे (९७६३७१२३०१) , संदिप वाघोले सर(९८६०७७७४२२) यांच्या व्हाटसपच्या क्रमांकावर पाठवाव्यात, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष मुकुंदमामा काळे यांनी केले आहे.





