banner ads

अध्यात्मातुन युवकांना संस्काराची दिशा-विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 अध्यात्मातुन युवकांना संस्काराची दिशा-विवेक कोल्हे


कोपरगांव  ( लक्ष्मण वावरे )


         संत महंतांनी समाजाच्या उध्दारासाठी मोठे काम केले असुन, गंगा गोदावरी मातेच्या काठावर अनेकांनी तपश्चर्या करत कोपरगाव पंचक्रोशीला ऐतिहासिक आध्यात्मिक संस्काराने समृद्ध केले आहे. अध्यात्मातुन युवकांना संस्काराची दिशा मिळते असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

         सालाबादप्रमाणे याही वर्षी शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सांस्कृतिक मंडळ, संजीवनी उद्योग समुह, व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्यावतीने तिसाव्या अखंड ज्ञानेश्वरी पारायण व हरिनाम सप्ताहाचे हनुमान मंदिरात आयोजन करण्यांत आले होते त्याची सांगता सोमवारी बाजाठाणचे हभप अरूणनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनांने झाले त्याप्रसंगी ते बोलत होते.
            या सप्ताहाची सुरुवात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मठाधिपती परमपूज्य रमेशगिरी महाराज यांच्या शुभहस्ते ग्रंथ पूजनाने करण्यात आली होती. कार्यकारी संचालक सुहास यादव अध्यक्षस्थानी होते. रमेशगिरी महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पसायदानाचे महत्त्व विषद केले. प्रारंभी साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी प्रास्तविकांत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्या जाणा-या विविध अध्यात्मीक, सांस्कृतिक, धार्मीक कार्याची माहिती दिली.
           विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी सांस्कृतीक मंडळाच्या माध्यमांतुन कारखाना कार्यस्थळावर अध्यात्मीक परंपरा नेहमीच जोपासल्या आहेत. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी हा वारसा समर्थपणे पुढे चालविला आहे. तोच वसा आम्ही युवक घेत आहोत. आज गावोगावी असंख्य बाल कीर्तनकार तयार होत आहेत. गोदावरी धामचे महंत रामगिरी महाराज हे देखील अध्यात्म प्रसारासाठी काम करत आहेत . हभप अरूणनाथगिरी महाराज काल्याचे किर्तनात बोलतांना म्हणाले की, आपसात वैर ठेवु नका, एकोप्याने रहा, युवकांनी निर्व्यसनी रहावे. अध्यात्मातुन संस्कार शिकवण घ्यावी., संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून जीवनाचे सार सांगितले आहे. ज्ञानेश्वरी सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. त्यातून जीवन आचरणाचे बोध होतात. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने अध्यात्माचा काला तुम्हा आम्हाला दिला आहे. 
          याप्रसंगी संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे, ज्ञानदेव औताडे, कोपरगांव तालुका महिला बचतगटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे, बाळासाहेब पानगव्हाणे, कामगार नेते मनोहर शिंदे, संजीवनी उद्योग समुहातील विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, सर्व संचालक, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, कामगार, भाविक, महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार वसंत थोरात यांनी मानले. पारायणास ५१ भाविक बसले होते. संजीवनी विश्रामगृहाच्यावतीने शेवटी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!