banner ads

नागरिकांनी मानले आ.आशुतोष काळेंचे आभार

kopargaonsamachar
0

 निळवंडेच्या ओव्हर फ्लोच्या पाण्यातून पाझर तलाव, बंधारे,ओढे तुडुंब



शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या देखील अपेक्षा वाढल्या 

कोपरगाव ,( लक्ष्मण वावरे )

:कोपरगाव मतदार संघातील निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना मोठा दिलासा मिळाला असून आ.आशुतोष काळे यांनी समय सूचकता दाखवत पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून लाभक्षेत्राच्या सर्व गावातील पाझर तलाव,साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्याबद्दल काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर व मतदार संघातील राहाता तालुक्यातील चितळी, धनगरवाडी, वाकडी या गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले .

.चालू वर्षी मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाच्या चिंता मिटल्या होत्या व भूजल पातळी देखील टिकून असल्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या देखील चिंता उरल्या नव्हत्या त्यामुळे शेतकरी निर्धास्त झाले होते. परंतु मागील काही वर्षापासून लहरी झालेला पाऊस कधी गायब होईल याचा काही नेम नव्हता.
मे आणि जून महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे सर्व धरणे जुलै महिन्यातच भरली जावून जायकवाडी धरणात देखील अपेक्षेपेक्षा जास्त पाणी वाहून गेल्यामुळे जायकवाडी धरण देखील जुलै महिन्यात ८० टक्याच्या वर पोहोचले जावून जायकवाडी धरणात ओव्हर फ्लोचे पाणी सुरूच होते. याच ओव्हर फ्लोच्या पाण्यातून लाभक्षेत्रातील सर्व पाझर तलाव,साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरून घेतल्यास भूजल पातळी वाढली जावून पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाच्या चिंता पण मिटणार होत्या. त्यामुळे आ. आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला केलेल्या सूचनेवरून लाभक्षेत्राच्या सर्व गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहेत. उर्वरित गावातील पाझर तलाव व साठवण बंधारे भरण्यासाठी आवश्यक असलेली सिमेंट पाईप लाईन करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांचा पाठपुरावा सुरु असून त्या गावांना देखील बंधारे भरण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था होणार आहे.
दीर्घ काळापासून पाणी टंचाईला सामोरे जाणाऱ्या कोपरगाव मतदार संघातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर व चितळी, धनगरवाडी, वाकडी या गावांमध्ये आता सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या चिंता मिटल्या आहेत. त्यामुळे पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले असून त्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी आ.आशुतोष काळे यांची समयसूचकता,नियोजनबद्ध व्यवस्थापन, वेळेवर प्रकारची मदत करण्याची वृत्ती यामुळे याही वर्षी निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील सर्व गावातील पाझर तलाव, साठवण बंधारे व ओढे पूर्ण क्षमतेने तुडुंब भरले आहेत.आ.आशुतोष काळे यांचा पाठपुरावा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामाबरोबरच रब्बी हंगामाच्या देखील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.



 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!