टाकळी येथे भाजपाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
भाजपाची संघटन रचना ही बळकट नेतृत्व आणि कार्यकर्त्यांच्या समर्पणावर उभी आहे.अशा नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि एक संघ कार्य संस्कृती निर्माण करणे हीच पक्षाची ताकद ओळखुन कोपरगाव मतदार संघातील टाकळी ग्रामपंचायतचे सरपंच संदिप श्रीपत देवकर यांनी नवनिर्वाचित भाजपा पदाधिकारी यांचा सत्कार करुन सर्व मान्यवरांना नव्या जबाबदाऱ्यांसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे ,मा.आ.व राज्य भाजपा कार्यकारिणी सदस्या स्नेहलता कोल्हे,युवा नेते विवेक कोल्हे यांनी नुकत्याच भाजपा पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या त्यात टाकळी येथील भाजपा चे नवनिर्वाचित पदाधिकारी युवा मोर्चाचे अध्यक्ष सतिष देवकर, किसान मोर्चाचे सरचिटणीस विजय देवकर, अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष सुलेमान तांबोळी, महिला मोर्चाच्या सदस्या मनिषा बाबासाहेब देवकर, अल्पसंख्याक मोर्चाचे सरचिटणीस अल्लाउद्दीन शेख, शहर उपाध्यक्ष राहुल खरात, तसेच गणेश देवकर यांची पत्रकार संघाच्या खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सरपंच संदिप देवकर यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.यावेळी ज्ञानेश्वर वाकचौरे, चिंतामणी देवकर, राजेंद्र देवकर, बाळासाहेब देवकर, राजेंद्र साहेबराव देवकर,गोरक्ष देवकर, भागवत देवकर, दत्तात्रय शेलार,आदि उपस्थित होते.






