परशुराम अनर्थे महाराज आदर्श रामायणाचार्य पुरस्काराने सन्मानित
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथिल रामायणाचार्य परशुराम अनर्थे महाराज यांना खासदार भाऊसाहेब वाकचौरे मित्र मंडळ व साई अर्पण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "आदर्श रामायणाचार्य " पुरस्कार खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
रामायणाचार्य परशुराम अनर्थे महाराज यांनी संत विचार धारा वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आध्यात्मिक धडे. देऊन अनेक किर्तनकार, प्रवचनकार, घडवले, अनर्थे महाराज यांनी श्री क्षेत्र गोदाधाम सरला बेट येथे काही वर्ष तर. आळंदी येथे वारकरी शिक्षण घेतले. हरियाणा येथे रामायणातील धडे घेत आध्यात्मिक अभ्यास केला.ह.भ.प.परशुराम अनर्थे महाराज यांच्या वारकरी, संप्रदाय , आध्यात्म, व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल संगमनेर तालुक्यात रहीमपुर येथे
झालेल्या कार्यक्रमात युवा नेते रोहित वाकचौरे यांचे वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात
हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी
ग्राहक सेना जिल्हाध्यक्ष मुकुंद सिनगर, स्विय सहाय्यक शंकरराव सिनगर आदींसह मान्यवर उपस्थित होते






