विघ्नहर्ता कृपेने श्री गणेश कारखाना निर्विघ्नपने भरभराट करेल - रामगिरी महाराज
श्री गणेश कारखाना येथे गणेश मूर्ती स्थापना संपन्न
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
श्री गणेश कारखाना चांगला चालेल, गणपती या कारखान्यावर विघ्न येवु देणार नाही, असे प्रतिपादन सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांनी केले.
श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्री गणेशाची महंत रामगिरी महाराज, कोल्हे कारखाना अध्यक्ष युवानेते विवेक कोल्हे, गणेशचे अध्यक्ष सुधिर लहारे, उपाध्यक्ष विजयराव दंडवते, कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे या सर्वांच्या हस्ते पुजन होवुन स्थापना करण्यात आली. त्याप्रसंगी महंत रामगिरी महाराज बोलत होते.
महंत रामगिरी महाराज यांनी श्री गणपतीचे वैशिष्ट्ये, महत्व श्रोत्यांना विस्तृत स्वरुपात सांगितले. कोणत्याही कार्याला आरंभ गणेश पुजनानाचे होते.धर्म अनेक असले तरी सुरुवात गणेश पुजनानेच होते. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्ययात गणेशाची वंदना दिली आहे. ते सांगत महाराज म्हणाले, ओमकार गणेशाचे सगुण स्वरुप आहे.
गणेश कारखान्याचे नाव गणेश आहे. त्यामुळे गणपती बाप्पा गणेश कारखान्यावर विघ्न येवु देणार नाही. गणेश अडचणीतुन मार्ग काढत आहे. अडचण नाही असा संसार नसतो. कारखान्यावर कामगारांचा, शेतकर्यांची, व्यापार्यांचा संसार चालतो. कारखाना कामधेनू आहे. प्रत्येकाने हे आपलेच काम म्हणुन काम केले तर कारखाना पुढे जातो.
याप्रसंगी गणेशचे मार्गदर्शक युवानेते विवेक कोल्हे म्हणाले कारखान्यावर आलेले संकट, व अडचणी गणपती बाप्पाच दूर करतो. माणुस किती ही मोठा असला तरी त्याला धार्मिकतेची जोड लागते. सराला बेटाशी गणेश कारखान्याची नाळ जुळलेली आहे. ब्रम्हलिन नारायणगिरी महाराज यांचे नाव गणेश च्या सभागृहाला दिलेले आहे. सर्वजण या सभागृहाचे पावित्र्य जपतात. अध्यात्मिक उर्जा चांगल्या कामासाठी आवश्यक असते. अनंत अडचणीतही मार्ग निघतात. आठ दहा वर्षात कधी नव्हे एवढा साखर उतारा आपल्याला पाहिल्याच वर्षी मिळाला.
यावेळी कार्यकारी संचालक जी. बी. शिंदे यांचेही भाषण झाले. सुत्रसंचालन सेक्रेटरी नितीन भोसले यांनी केले तर आभार संचालक अनिल गाढवे यांनी मानले. जेष्ठ संचालक नारायणराव कार्ले, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, सराला बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज, संचालक सर्वश्री बाबासाहेब डांगे, गंगाधर डांगे, संपतराव हिंगे, नानासाहेब नळे, बाळासाहेब चोळके, महेंद्र गोर्डे, विष्णुपंत शेळके, अरविंदराव फोपसे, अरुंधतीताई फोपसे, अनिलराव गाढवे, संपतराव चौधरी, शोभाताई एकनाथराव गोंदकर, कमलाताई धनवटे, मधुकरराव सातव, आलेश कापसे, अनिलराव टिळेकर, ज्ञानदेव चोळके, गंगाधर चौधरी भाऊसाहेब थेटे, सखाराम चौधरी, चंद्रभान गुंजाळ, योगेश निर्मळ, डॉ. लबडे, राजेंद्र लहारे, अनिल बोठे, धनंजय गाडेकर, चंद्रभान धनवटे, सदाशिव गाडेकर, उत्तमराव मते, रमेश गागरे, बी. एल. आहेर, सुरेश चौधरी, सुभाष कापसे, विनायक देठे, शेळके यांचेसह सभासद, शेतकरी, खातेप्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.






