banner ads

शेतकऱ्यांवरील संकटे गणपतीराया दूर करो बिपीनदादा कोल्हे यांची श्रीगणेशाला प्रार्थना

kopargaonsamachar
0

 शेतकऱ्यांवरील संकटे गणपतीराया दूर करो बिपीनदादा कोल्हे यांची श्रीगणेशाला प्रार्थना


अद्ययावत सुविधायुक्त मोफत फिरता दवाखाना लोकसेवेसाठी सज्ज
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

कोपरगाव मतदारसंघासह सर्वांचे तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद शेतकऱ्यांवरील संकटे,विघ्न गणपतीराया दूर करो आणि सर्वांच्या जीवनात आनंद सुखाने भरभराट व्हावी असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले.
           सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी कारखाना कार्यस्थळावर श्री गणपतीची स्थापना उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे व त्यांच्या पत्नी या उभयतांच्या हस्ते करण्यात आली, त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे फिरत्या दवाखान्याची अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त मोफत फिरता दवाखाना गणेशचतुर्थीच्या मुहूर्तावर कोपरगावकरांच्या सेवेत दाखल करण्यात आला, त्याचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

 
            प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ज्येष्ठ संचालक त्र्यंबकराव सरोदे यांनी प्रास्ताविकात सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघासह शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्यता निर्माण करण्यासाठी राबवलेल्या सर्व उपक्रमांची माहिती देऊन युवा अध्यक्ष विवेक कोल्हे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी राबवीत असलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगाचे कौतुक केले.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, गणपती सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी देवता आहे. प्रत्येक शुभकार्याप्रसंगी त्याचे सर्वप्रथम वंदन केले जाते. स्वातंत्र्यवीर लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला जागतिक स्तरावर उंचावण्यात मोलाचा हातभार लावला आहे. देश विदेशात आजपासून सर्वत्र दहा दिवस गणपती रायाचे वंदन बाळ गोपाळासह सर्वत्र साजरे होत आहे. संजीवनी कार्यस्थळावरील ही परंपरा अव्यहत चालू आहे. आज प्रत्येकाच्या जीवनात ताण तणाव वाढून आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावतआहे.  सर्व रुग्णांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मृतिप्रत्यर्थ गावोगाव फिरता दवाखाना उपक्रम सुरू केला आहे, यातून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा रुणांपर्यंत मिळावी यासाठी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या सेवेचे आधुनिकीकरण केले आहे ते रुग्णांच्या सेवेत आज लोकार्पण करीत आहे. डॉ. सोनवणे रुग्ण तपासणीत अव्यहत योगदान देत आहेत असेही ते म्हणाले.
             याप्रसंगी संचालक संचालक ज्ञानेश्वर परजणे, आप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, ज्ञानेश्वर होन, बापूसाहेब बाराहाते, बाळासाहेब पानगव्हाणे, कामगार नेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे, सहाय्यक लेखापाल प्रवीण टेमगर, राजेंद्र पाबळे, सर्व खाते प्रमुख, उपखाते प्रमुख, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले. गणेश स्टेज कार्यस्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!