कु.साक्षी कुहिरे हिची ‘सुवर्ण’पदकाला गवसणी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील प्रथम वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी कु. साक्षी एकनाथ कुहिरे हिने ‘राष्ट्रीय युथ गेम्स व राष्ट्रीय स्कूल गेम्स’ यांच्या सहकार्याने नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या जलतरण स्पर्धेत ५० मीटर फ्री स्टाईल क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले.
तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथकाका शिंदे तसेच महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.





