banner ads

काळे कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी प्रवीण शिंदे यांची निवड

kopargaonsamachar
0

 काळे  कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी प्रवीण शिंदे यांची  निवड


कोपरगाव  ( लक्ष्मण वावरे )
  कोपरगाव तालुका व पंचक्रोशीतील शेतकरी, छोटे-मोठे व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांच्या अर्थकारणाला चालना देणाऱ्या व सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्याची कामधेनु असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी कारखान्याचे संचालक प्रवीण जगन्नाथ शिंदे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत बिनविरोध निवड करण्यात आली . त्यांच्या निवडीबद्दल कारखान्याचे जेष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे विद्यमान व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या व्हा.चेअरमनपदी  शिंदे यांची निवड करण्यात आली. यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित व्हा.चेअरमन  शिंदे म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच प्रत्येक कार्यकर्त्यांवर कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले असून माझ्या शिंदे कुटुंबावर देखील त्यांनी भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे आमचे कुटुंबातील सदस्यांना यापूर्वी दोन वेळेस व्हा.चेअरमन पदाची जबाबदारी मिळाली व माझ्या कुटुंबातून मी तिसऱ्यांदा व्हा.चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळणार आहे हे केवळ काळे कुटुंबियाच्या प्रेमामुळे शक्य झाले असून काळे परिवाराची ही परंपरा कारखान्याचे चेअरमन व कोपरगाव तालुक्याचे  आमदार आशुतोष काळे हे पुढे चालवत आहे.   कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असतांना कारखाना देखील प्रगतीपथावर आहे. अशी दुहेरी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या व्हा.चेअरमनपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल नवनिर्वाचित व्हा.चेअरमन प्रवीण शिंदे यांनी  आभार मानले.

यावेळी बोलतांना मावळते व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण म्हणाले की,कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या सोबत व्हा.चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळत असतांना आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीतून त्यांच्या सहकारी साखर कारखानदारीच्या सूक्ष्म अभ्यासाची अनुभूती आली. सर्व सहकारी सदस्यांना विश्वासात घेवून आ.आशुतोष काळे यांनी सर्वोतोपरी सहकार्य केल्यामुळे माझी जबाबदारी उत्कृष्ठपणे पार पाडता आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी कारखान्याचे मावळते व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, डॉ.मच्छिन्द्र बर्डे, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, सचिन चांदगुडे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम, सुनिल मांजरे, मनोज जगझाप, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, दिनार कुदळे, अशोक मवाळ, प्रशांत घुले, सौ.वत्सलाबाई जाधव, सौ. इंदुबाई शिंदे, श्रावण आसणे, गंगाधर औताडे, कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे, जनरल मॅनेजर सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, डेप्युटी सेक्रेटरी संदीप शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर) अहमदनगर संजय गोंदे यांनी काम पाहिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!