banner ads

जिल्हा परिषद शाळेचा वाढता आलेख कौतुकास्पद -- राजेश परजणे :

kopargaonsamachar
0

 जिल्हा परिषद शाळेचा वाढता आलेख कौतुकास्पद  --राजेश परजणे 

कोपरगाव  ( लक्ष्मण वावरे )
अलीकडच्या काळात राज्यातील सर्वच जिल्हा परिषद शाळेतील घटणारी पटसंख्या ही समस्या बनली आहे. शासन यासाठी विविध उपक्रम राबवत आहे. परंतु; या सर्व बाबीचा विचार करता अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मात्र; वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा मागील तीन वर्षाचा पटाचा आलेख वाढता असून इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी देखील या शाळेत प्रवेश घेत आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली मध्ये तब्बल 70 विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले आहेत, ही संख्या तालुक्यातील सर्वाधिक असल्याने ही बाब निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी काढले.

      कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय उपयोगी विविध कामांचे लोकार्पण, उद्घाटन तसेच राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, शब्दबाग उजळणी पुस्तिका याचे वाटप राजेश परजणे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते.  यावेळी राजेश परजणे यांच्या हस्ते चिकूच्या झाडाची लागवड करण्यात आली. 
     यावेळी व्यासपीठावर कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, सरपंच योगिता जाधव, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, माजी सरपंच सतीशराव कानडे, पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर टेके, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, परसराम टेके, अँड. शरद जोशी, अण्णासाहेब ठोंबरे, नामदेव जाधव, केंद्रप्रमुख विलास भांड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार रोहित टेके, राजेश काबरा, ग्रामपंचायत अधिकारी संग्राम बोर्डे, गजेंद्र शिंदे, वसंत गोरे, ग्रा.पं. सदस्य दिलीप काकळे, सरला जाधव, राधिका पठाडे, प्रतिभा टेके, लता कडू, सोनाली महापुरे, स्मिता काबरा, निर्मला भारूड, रोहिणी लोखंडे, छाया कोरके, शितल खटावकर, अलका दुबे, शकीला न्हावकर, प्राची जोशी, व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष दिपाली बनभेरु, सोनाली सोनवणे, ह.भ.प.डॉ. सर्जेराव टेके, गणेश भाटी, शशिकांत जाधव, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरीफ शेख, जयसिंग बनगैय्या, स्वप्निल टेके, वारी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, कैलास शेळके उपस्थित होते. यावेळी सरपंच योगिता जाधव, मधुकर टेके यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणातून मच्छिंद्र टेके यांनी शाळेचा इतिहास सांगत विद्यार्थ्यांच्या होत असलेला विकास आणि भौतिक सुविधा याबद्दल समाधान व्यक्त केले.
    कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, सुधाकर आंबिलवादे, पांडुरंग खाडे, गोविंदा पोरे, गोरक्षनाथ साबळे, भागा जाधव, दत्तात्रय चव्हाण, प्रवीण आहेर, अरुण पवार, शर्मिला विधाते, स्वरा टेके या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोहित टेके यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय चव्हाण व प्रवीण आहेर यांनी केले तर प्रकाश गोर्डे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!