वारीत रंगला बालगोपाळांच्या दिंडीतील रिंगण सोहळा
कामिका एकादशी : जि. प्र. शाळा व रामेश्वर विद्यालयाचा संयुक्त उपक्रम
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
तालुक्यातील वारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्लिश स्कूल व श्री रामेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी कामिका एकादशीनिमित्त बालगोपाळाचा दिंडी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिंडी सोहळ्यात दोन्ही शाळेतील बालगोपाळांनी साकारलेली विठ्ठल-रखुमाई, संत तुकाराम तसेच वारकऱ्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. गेल्या तीन वर्षीपासून शाळेतील विद्यार्थ्यांना दिंडीचा आनंद घेता यावा, यासाठी दुसऱ्या आषाढी एकादशीला हा दिंडी सोहळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दिंडी सोहळा पार पडला.
या दिंडी सोहळ्यात 400 पेक्षा जास्त बालगोपाळ वारकरी विधार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी विध्यार्थ्यासाठी दोन पालख्या सजविण्यात आल्या होत्या. एका पालखीत पुस्तक तर दुसऱ्या पालखीत झाडाचे छोटेसे रोपटे ठेवण्यात आले होते. यावेळी सजवलेल्या पालख्या, झेंडेकरी, डोक्यावर तुळस घेऊन विद्यार्थिनी, लेझीम, ढोल, टाळांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयघोष करीत शाळेपासून प्रस्थान होऊन संपूर्ण गावातून हा दिंडी सोहळा मिरविण्यात आला. गावातील अंबिका उद्योग समूहाच्या प्रांगणात मोठा रिंगण सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी माजी सभापती मच्छिंद्र टेके, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, अॅड. शरद जोशी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, डॉ. सर्जेराव टेके, वसंत गोरे, मच्छिंद्र गांगड, कृष्णाराव जाधव, आदिनाथ वायडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत माळी, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक शरीफ शेख यांच्यासह उपस्थित मान्यवर, पालक यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. या भव्य रिंगणाने भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या नामघोषात आसमंत दुमदुमुन गेला होता.
यावेळी ठिकठिकाणी ग्रामस्थांनी विठ्ठल – रखुमाई यांच्यासह बालगोपाळ वारकऱ्यांचे पूजन केले. तसेच खाऊ दिला. यावेळी बालगोपाळांनी तसेच पालकांनी फुगडी खेळत दिंडी सोहळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. याप्रसंगी बालगोपाळ वारकऱ्यांना खाऊ तसेच महाप्रसादाचे वाटप करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पालक, ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पालक व ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येत पालक उपस्थित होते.