banner ads

संजीवनीच्या ८२७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या

kopargaonsamachar
0

 संजीवनीच्या ८२७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या

  रू २७ लाखांचे उच्चांकी वार्षिक  पॅकेज
कोपरगांव / लक्ष्मण वावरे 
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज अँड  एमबीएच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाने वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांशी  संपर्क साधुन कंपन्याना अभिप्रेत असणारे तंत्रज्ञान विविध विभागांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये बिंबविले. याचाच परीपाक म्हणुन तब्बल ८२७ विद्यार्थ्यांना वार्षिक  पॅकेज रू २७ लाखांपर्यंतच्या नोकऱ्या  मिळाल्या, यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात आनंदाचे वातावरण संचारले आहे, अशी  माहिती संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज अँड  एमबीएच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

          चालु वर्षी  दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू २७ लाख, चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू २१ लाख, जपानच्या कंपनीने १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू १७ लाख, तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू ११. ८३ लाख, पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू ११ लाख, दहा विद्यार्थ्यांना प्रत्येकी रू ९ लाख असे वार्षिक  पॅकेज मिळाले. सरासरी प्रत्येकी  रू४. ५ लाखांचे वार्षिक  पॅकेज मिळालेे.  
   यात शाखा  निहाय नोकरी मिळालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे. कंसात विद्यार्थी संख्या आहे. कॉम्प्युटर इंजिनिअरींग (१०६), इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (८२), मेकॅनिकल इंजिनिअरींग (१९८), इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींग (३५), इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग (७०), सिव्हिल इंजिनिअरींग (७१), मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरींग (७८), स्ट्रक्चरल इंजिअिरींग (५९) व एमबीए (१२८).


माजी मंत्री स्व. शंकरराव  कोल्हे यांनी ४२ वर्षांपूर्वी  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजची स्थापना केली. दर्जा व गुणवत्तेमध्ये कधीही तडजोड करायची नाही, अशी  त्यांची शिकवण  असायची. तीच परंपरा संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली  पुढे राबविण्यात आली. स्व. कोल्हे यांच्याच मार्गदर्शनाखाली  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आणि हा दर्जा प्राप्त करणारे संजीवनी हे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील  पहिले महाविद्यालय ठरले. उद्योगांना अभिप्रेत असलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव करण्यात आला. केवळ तांत्रिक अभ्यासक्रम न शिकविता  चांगल्या व्यक्तीमत्वाचे सर्व पैलु विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी सर्व शिक्षक  सर्वोतोपरी प्रयत्न करतात. या सर्व बाबींचा परीणाम म्हणुन ८२७ विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळाल्या, तर काही विध्यार्थ्यानी उद्योजक होण्याचा निर्धार केला आहे, ही बाब स्व. शंकरराव  कोल्हे यांना आदरांजली ठरणारी आहे. - 
अमित कोल्हे
मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स .
       संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले विद्यार्थी, त्यांचे पालक, डायरेक्टर डॉ. एम. व्ही. नागरहल्ली, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची सर्व टीम, विभाग प्रमुख व डीन्स यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!