banner ads

नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले

kopargaonsamachar
0

 उमरावतीला पाणी सात गावांचे बंधारे भरल्याने  होतोय फायदा

नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले

कोपरगाव/ लक्ष्मण वावरे 
 कोपरगाव तालुक्यातील मढी, खु., मढी बु., देर्डे चांदवड, घारी, चांदेकसारे, डाऊच बु., डाऊच खु., या सात गावांसाठी जीवनदायिनी असणाऱ्या उमरावती नदीला आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाणी सोडण्यात आले असून त्यामुळे या सातही गावातील सर्व बंधारे भरले आहेत व हि सातही गावे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाली असल्याचे घारी येथील काळे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी जाधव यांनी सांगितले आहे.
मढी, खु., मढी बु., देर्डे चांदवड, घारी, चांदेकसारे, डाऊच बु., डाऊच खु., या सात गावात अनेक बंधारे आहेत. ज्या बंधाऱ्यांचे भवितव्य हे उमरावती नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे सर्व बंधारे भरण्यासाठी उजव्या कालव्याच्या लगत असलेल्या मढी शिवारातील छोट्याशा उमरावती नदीला कालव्याचे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे या उमरावती नदीवर असणारे वरील गावातील सर्वच बंधारे भरले जातात. त्यामुळे या सातही गावातील भूजलपातळी वाढली जावून नागरीकांच्या पिण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटतो.

दरवर्षी आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून पाणी सोडले जात असल्यामुळे या सातही गावातील नागरीक पाण्याच्या बाबतीत निर्धास्त आहेत. दोन वर्षापूर्वी आ.आशुतोष काळे यांनी या उमरावती नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून घेतले आहे.पावसाळ्यात सातत्याने हि नदी वाहती असल्यामुळे नागरीकांना पाण्याची टंचाई जाणवत नाही. यावर्षी देखील मे आणि जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे नदीला पाणी येणार होते परंतु पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम काढल्यामुळे हे बंधारे भरले गेले नाही. मात्र हे काम आटोपले असून आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार उमरावती नदीला पाणी सोडण्यात आले असून सर्व बंधारे भरले आहेत. त्यामुळे ज्या विहिरींना पाणी नव्हते त्या विहीरींना मोठ्या प्रमाणात पाणी उतरल्यामुळे शेती सिंचनाचा प्रश्न सुटला असून मढी, खु., मढी बु., देर्डे चांदवड, घारी, चांदेकसारे, डाऊच बु., डाऊच खु., हि  गावे पाण्याच्या बाबतीत समृद्ध झाली आहेत. त्याबद्दल या गावातील नागरीकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!