banner ads

तीन वर्षे उलटले अद्यापही निवृत्ती वेतन नाही

kopargaonsamachar
0

 तीन वर्षे उलटले अद्यापही निवृत्ती वेतन नाही 

जिल्हा आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ 
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील मच्छिंद्र बाळाजी जावळे हे आरोग्य विभागात राहता तालुक्यातील सावळीविहिर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन वर्षे उलटले मात्र जिल्हा आरोग्य विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे त्यांना अजूनही निवृत्तीवेतन चालू झाले नाही. यामुळे जावळे यांचे कुटुंब हवालदिल झाले आहे.

मच्छिंद्र जावळे यांनी महसूल विभागात तसेच ग्रामपंचायत विभागात पारदर्शक सेवा केली. नंतर त्यांना जिल्हा आरोग्य विभागात आरोग्य सेवक म्हणून बढती मिळाली. कोपरगाव व राहता तालुक्यात त्यांनी उत्कृष्ट सेवा करत वयोमानानुसार 31 मे 2023 रोजी सेवानिवृत्ती स्वीकारली. निवृत्त. झाल्यानंतर आज तीन वर्षे पूर्ण झाले मात्र अजूनही त्यांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नाही ही दुर्दैवी बाब आहे. जिल्हा आरोग्य विभागात वारंवार पाठपुरावा करत पत्रव्यवहार करत त्यांनी तीन वर्षे हेलपट्टी मारले. मात्र त्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत अधिकारी दखल घेत नसल्याचे त्यांना जाणवले. 
एखाद्या आरोग्य सेवकावर अशी वेळ फक्त संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत निर्णय घेतला नाही म्हणून आली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांच्या निवृत्ती वेतनावर अवलंबून असल्याने आज ना उद्या आपल्याला लाभ मिळेल या आशेने ते अहिल्या नगरला चक्कर मारून थकले. जिल्हा आरोग्य विभागाने आता तरी माझी हेळसांड थांबवावी व  निवृत्तीवेतन चालू करावे अशी अपेक्षा त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!