डॉ. दिपक टिळक यांच्या निधनांने केसरीचा आधारस्तंभ हरपला
कोपरगांव-/ लक्ष्मण वावरे
केसरी वृत्तपत्राचे विश्वस्थ संपादक व टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगूरू व स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दिपक जयंतराव टिळक यांच्या निधनाने केसरीचा आधारस्तंभ हरपला. त्यांच्या जाण्यांने व्यासंगी पत्रकारितेच्या अभ्यासकाला मुकलो अशा शब्दात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शोक व्यक्त केला. माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचेवतींने श्रध्दांजली वाहिली.
. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राच्या समाजकारणाचा ठेवा केसरी वर्तमानपत्राच्या रूपांने जनमानसांत चालविला. पुढे जयंतराव टिळकांनी हा वारसा जपला आणि डॉ. दिपक टिळक यांनी बदलत्या परिस्थितीत त्याला पुढे नेण्यांचे काम केले. सध्याच्या समाजमाध्यमांत केसरी वृत्तपत्राचे स्थान वेगळे होते. डॉ. दिपक टिळक यांनी वृत्तपत्रामधील समस्या यावर प्रबंध सादर करत पी. एच. डी मिळविली होती. माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी डॉ. दिपकरावांचे वडील कै. जयंतराव टिळक यांच्याबरोबर विधीमंडळात काम करत राज्याच्या हितावह अनेक चर्चामध्ये भाग घेवुन आपापली मते जाहिरपणे मांडली होती. डॉ. दिपक टिळक यांच्या निधनांने टिळक विद्यापीठाचा पाया घालणारे व्यक्तीमत्व आपल्यातुन हरपले असेही बिपिनदादा कोल्हे शेवटी म्हणांले.





