अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ७ आरोपींविरुध्द कारवई लाखोचा मुद्देमाल जप्त.
कोपरगाव तालुकापोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकाची कामगिरी
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी कोपरगाव तालुक्यात वाळू तस्करांवर कारवाई करत लाखोचा मुद्देमाल जप्त केला.
, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील माहेगाव देशमुख गावाजवळील गोदावरी नदी पात्रातून काही इसम बेकायदेशीर रित्या वाळू उपसा करुन तिची चोरटी वाहतूक करत असून आता गेल्यास मिळून येतील. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे तात्काळ कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर होऊन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ व कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय व खाजगी वाहनाने नमूद ठिकाणी रवाना झाले. वरील नमूद ठिकाणी माहेगाव देशमुख शिवार, गोदावरी नदी पात्रामध्ये विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार पोहचले असता सदर ठिकाणी काही इसम हे गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा करुन ती उपासलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी ढंपर व ट्रॅक्टर मध्ये भरुन वाहतूक करताना दिसले. पोलीस पथकाची खात्री होताच पथकाने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेले इसम वाहनासह पळून जाऊ लागले. त्यांचा पोलीस पथकाने
पाठलाग करुन ०४ ढंपर व ०१ ट्रॅक्टर पकडून पकडलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याची ओळख सांगून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव क्र. ०१ ढंपर वरील चालक अर्जून भाऊसाहेब गुरुळे वय ३० वर्षे रा. मुर्शदपूर ता. कोपरगाव असे सांगून सदर ट्रॅक्टरचा मालक मीच असल्याचे सांगितले. क्र. ०२ वरील ट्रॅक्टर चालकाने त्याचे नाव संतोष लक्ष्मण ठमके वय ३० वर्षे रा. मुर्शदपूर ता. कोपरगाव असे सांगून मालक अर्जून भाऊसाहेब गुरुळे रा. मुर्शदपूर ता. कोपरगाव असल्याचे सांगितले. क्र.०३ ढंपर चालकाने त्याचे नाव गणपत पंडीत पवार वय २७ वर्षे रा. पारेगाव ता. येवला जि.नाशिक असे सांगून ढंपर मालक अमोल वसंत मांडगे (फरार) रा. कोपरगाव असल्याचे सांगितले. क्र.०४ ढंपर चालकाने त्याचे नाव अमोल लक्ष्मण इंगळे वय ३१ वर्षे रा. मळेगाव थडी ता. कोपरगाव असून सांगून ढंपर मालक रामा कुंदलके (फरार) रा.कोळपेवाडी ता. कोपरगाव असल्याचे सांगितले. तसेच क्र.०५ ढंपरवरील पळून गेलेल्या चालक व मालकाबाबत पकडलेल्या इसमांना विचारपूस केली असता सदर ढंपर चालक व मालक अजय शेळके (फरार) रा. कोपरगाव
असे असल्याचे सांगितले. वरील प्रमाणे पकडलेली ढंपर, ट्रॅक्टर त्यांचे चालक व मालक हे माहेगाव देशमुख ता. कोपरगाव जि. अहिल्यानगर येथून गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना बेकायदा चोरुन वाळूचा उपसा करुन ती ढंपर, ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाहतूक करुन तिची विक्री करण्याच्या उद्देशाने अवैध रित्या वाहतूक करताना मिळून आले. त्याचे वर्णन खालीलप्रमाणे
१) ७,१०,००० /- रुपये किं.चा क्र.०२ निळया रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली त्यामध्ये ०१ ब्रॉस वाळू
२) १२,००,००० /- रुपये किं.चा क्र.०१ चा टाटा कंपनीचा ९१२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा ढंपर
३) १२,००,००० /- रुपये किं.चा क्र.०३ टाटा कंपनीचा ९१२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा ढं
४) १२,२०,००० /- रु.किं.चा क्र.०४ टाटा कंपनीचा ९१२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा ढंपर त्यामध्ये ०२ ब्रॉस वाळू
५) १२,२०,००० /- रु. किं.चा क्र.०५ टाटा कंपनीचा ९१२ मॉडेलचा पिवळ्या रंगाचा ढंपर त्यामध्ये ०२ ब्रॉस वाळू
असा एकूण ५५,५०,००० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो पंचांसमक्ष जप्त करुन ,०७ आरोपींविरुध्द कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं. २०८ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (ई), ३(५) सह
पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३ / १५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.





