banner ads

शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज – युवानेते विवेक कोल्हे

kopargaonsamachar
0

 शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज युवानेते विवेक कोल्हे



संजीवनीचा उद्योग समूह व संजीवनी फार्मर्स फोरमचा शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )


शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत तयार करता येतात. अशा उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण होईल शेतीपूरक व्यवसाय काळाची गरज असल्याचे मत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी फार्मर्स फोरम यांच्या सहकार्याने आयोजित शेतीपूरक व्यवसायातील संधी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमा पूजन मा.आ.स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे , मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे, शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या हस्ते करण्यात आले.

बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नितीन ढसाळ, संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड न्यू व्हेंचर्स संजीव पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि चेअरमन युवानेते विवेक कोल्हे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढवण्यासाठी विविध शेतीपूरक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घ्यावा.”
माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्व. शंकरराव कोल्हे यांनी भविष्यातील धोके ओळखून, शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंद्याची संकल्पना दिली. महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीचा पाया घातला आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध दिशा दाखवल्या. आज महिलांनी बचतगटांबरोबरच शेतीपूरक व्यवसायातही योगदान द्यावे त्या उत्तम पध्दतीने आर्थिक प्रगती साध्य करू शकतात.”

विवेक कोल्हे यांनी सांगितले की, “संजीवनी फार्मर्स फोरममार्फत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, विपणन आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत यावर माहिती दिली. मत्स्य शेती,केशर, मशरूम, कोरफड, रेशीम, बांबू यासारखे पर्याय शेतकऱ्यांना उपलब्ध आहेत.
मेळाव्याच्या शेवटी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर व इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याचे अभ्यासपूर्ण उत्तर विवेक कोल्हे यांनी दिले. आभार बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी मानले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!