शासकीय आय टी आय च्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी रामेश्वर कानडे यांची निवड
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
स्व सूर्यभान वहाडणे पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोपरगाव या संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी वारी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते व्यवसायाने मॅकॅनिकल इंजिनिअर असणारे रामेश्वर सतिश कानडे यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरावरून स्वागत होत आहे
महाराष्ट्र राज्यातील तिनशेहुन अधिक शासकीय आय टी आय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असुन कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री नामदार मंगलप्रभात लोढा यांच्या शिफारशी नुसार संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुबंई यांनी रामेश्वर कानडे यांची नियुक्ती जाहीर केली आहे
या निवडीबद्दल त्यांचा भन्साळी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा संजय भन्साळी, प्राचार्य एस के जाधव निदेशक आर के आहेर, उद्योजक अजिंक्य भन्साळी आदींनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या
निवडीबद्दल दि गोदावरी बायोरिफायणरीज साकरवाडीचे संचालक सुहास गोडगे,वारीच्या लोकनियुक्त सरपंच सौ योगिता जाधव,पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके वारीचे उपसरपंच विजय गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य प्रकाशराव गोर्डे, भा ज पा तालुका अध्यक्ष विशाल गोर्डे,माजी सरपंच बद्रीनाथ जाधव वारीचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच सतिश कानडे, माजी पंचायत समिती सदस्य मधुकर टेके,अशोकराव कानडे,ग्रा प सदस्य संदीप जाधव, भगवान पठाडे,राजेंद्र वाळुंज सामाजिक कार्यकर्ते मधुकर टेके, गोरख टेके,पत्रकार फकीर टेके,पञकार रोहीत टेके अण्णा खवले ,सतिश मैराळ,अजय मेहेरे,जय नवले आदींनी अभिनंदन केले आहे





