श्रमिक मजदुर संघाचा शालेय शिक्षण मंत्र्याच्या घरावर थाळी नाद मोर्चा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शालेय पोषण आहार शिकवणाऱ्या कर्मचारी यांना हरियाणा राज्य सरकारच्या धर्तीवर ७००० रुपये मानधन मिळावे, ५ जुलै २०२४ च्या मंत्रिमंडळ निर्णयाची अंमलबजावणी करावी,किमान २० लाखाचे विमा संरक्षण लागू करावे यासह विविध मागण्यासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना यांच्या वतीने ८ जून २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील राहत्या घरावर थाळी नाद मोर्चाचे आयोजन केल्याचे माहिती संघटनेच्या राज्य समन्वयक तथा अहिल्यानगर जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ सविता महेंद्र विधाते यांनी सांगितले. शालेय पोषण आहार कर्मचारी यांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे.दरवर्षी होणारा करार रद्द करून तो तीन वर्षातून एकदाच घ्यावा,या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तातडीची मदत रुपये एक लाख मिळावे अशा विविध मागण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी हा थाळी नाद मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.या बैठकीला संघटनेचे राज्य समन्वयक सुभाष सोनवणे, राज्य समन्वयक कैलास पवार,जिल्हा सरचिटणीस विद्या अभंग, कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश पानपाटील, किरण कदम,गुलाब शेख,सुभद्रा काटे,सुनीता लटके,मुक्ता पवार आदि पदाधिकारी उपस्थित होते





