banner ads

नेत्रदानाचा संकल्प करा मृत्यूनंतर मृत्युंजय बना

kopargaonsamachar
0

 नेत्रदानाचा संकल्प करा मृत्यूनंतर मृत्युंजय बना 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 नेत्रदानाचे महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षी १० जून हा दिन जागतिक दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला करण्यात येतो सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दहा जून हा दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचं सर्वात महत्त्वाचा उद्दिष्ट म्हणजे लोकांना नेत्रदानाचे महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे .
जागतिक आरोग्य संघटनेनुसार दृष्टी संबंधित आजार मोतीबिंदू काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हा नी मध्ये अग्रक्रमाने येतो १९४८ मध्ये डॉक्टर आर ही एस मुथया यांनी भारतातील पहिले कॉ नियल प्रत्यारोपण केले आणि देशातील पहिली नेत्र पिढीची स्थापना केली आय बँक असोसिएशन ऑफ इंडिया(EBAI) ही भारतातील नेत्रदान आणि नेत्र पिढीची मुख्य संस्था आहे नेत्रदान श्रेष्ठदान मानले जाते परंतु आजही नेतृत्वानाबद्दल जनजागृती पाहिजे त्या प्रमाणात झाली नसल्यामुळे अनेक जण संभ्रमात आहेत अनेक जण अंधश्रद्धा वगैर समजुती मुळे नेत्रदान करण्यास घाबरतात नेत्रदानामुळे अंध जणांना जग पाहण्यासाठी संधी मिळते इतरांना डोळ्यांमुळे मिळालेला प्रकाश हा त्यांच्यासाठी नवीन जीवना सारखा आहे नेत्रदान विषयी जनजागृती व्हावी यासाठी दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. यामागील उद्दिष्ट म्हणजे नेत्रदानाविषयी गैरसमज दूर करणे तसेच मृत्यूनंतर नेत्रदान करण्यास प्रवृत्त करणे हा आहे महाराष्ट्र राज्यात दर वर्षी साधारण ८.५ लाख लोकांना लोकांचा मृत्यू होतो त्यातील काही हजार लोकांचेच नेत्रदान केले जाते . राज्यात जवळपास ७७ नेत्र पिढी कार्यरत असून २४३ नेत्र प्रत्यारोपण केंद्र व ९२ नेत्र संकलन केंद्र आहेत बहुतांश ठिकाणी नेत्र पिढीची कागदोपत्री नोंद आहे परंतु नेत्रदानाचे काम करत नाहीत वीस ते पंचवीस नेत्र पिढी नेत्रदानाची २४ तास काम करत आहेत.

 अंधत्व ही विकसनशील देशांमधील सार्वजनिक आरोग्य समस्या पैकी एक आहे डब्ल्यू एच ओ च्या मते मोतीबिंदू काचबिंदू नंतर कॉर्निया  खराब होणे ही अंधत्व येण्याची एक प्रमुख कारण आहे नेत्र दान कोण करू शकते एक वर्ष ते ८० वर्षापर्यंत स्त्री पुरुष कोण ही नेत्रदान करू शकतो. दूरचा किंवा जवळचा चष्मा किंवा जे लोक लेंसेस घालतात ते सुद्धा नेत्रदान करू शकतात ज्यांना मोतीबिंदू आहे ते देखील, नेत्रदान करू शकतात ,नेत्रदान कोण करू शकत नाही एड्स ,कर्करोग ,हिपेटायटिस बी किंवा सी, रेबीज सेफ्टीसेमिया ,कॉलरा तीव्र रक्ताचा कर्करोग, तीव्र ल्युकेमिया, मेंदू जर यासारख्या संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असलेले लोक डोळे दान करू शकत नाही नेत्रदानाच्या वेळी काय काळजी घ्यावी मृत व्यक्ती ज्या खोलीत असेल तेथील पंखा बंद करावा त्यांचे डोळे बंद करून डोळ्यावर ओला कापूस ठेवावा अथवा रुमाल ठेवावा आणि डोळे खाली जाड उशी ठेवावी डॉक्टरांकडून डेथ सर्टिफिकेट तयार ठेवावा तसेच एक पासपोर्ट फोटो आधार कार्ड देखील रेडी ठेवा डोळ्यातील कॉर्निया मृत्यूनंतर सहा तासांच्या आत काढावे लागतात जरी मृत व्यक्तीने नेत्रदानाचे  इच्छा पत्र भरले नसेल तरीही नातेवाईकांच्या संमतीने त्या व्यक्तीचे नेत्रदान करता येते यात फक्त कॉर्निया काढला जातो पूर्ण डोळा नाही त्यामुळे चेहरा विद्रूप होत नाही मृत्यू नंतर ताबडतोब या आय बँकेची संपर्क साधावा मित्र पिढीची टीम जागेवर येऊन नेते नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करते डोळ्यांची काळजी कशी घ्यावी निरोगी आहाराचे सेवन करावे आहारात हिरव्या पालेभाज्या अंडी आणि गाजराचा जास्त समावेश करावा आहाराचे सेवन करावे धूम्रपान सोडावे धूम्रपानामुळे मोतीबिंदू ऑप्टिक आणि मज्जातंतू च्या नुस्कारासह दृष्टी संबंधित समस्या उद्भवतात संघ असेच वापर करावा सूर्यप्रकाशाच्या वाचण्यासाठी वापर करावा टीव्ही भक्तांना किंवा संगणकावर काम करताना अँटीक्लिअर चष्म्याचा वापर करा कमी प्रकाशयात वाचू नका  दररोज किमान दोन लिटर पाणी प्या त्यामुळे डोळे आणि त्वचेच्या डीहायड्रेशन होत नाही हे सर्व पथ्य पाळले तर तुम्हाला डोळ्याच्या समस्या उद्भवणार नाहीत मृत्यूनंतर या शरीराची राख किंवा माती होते त्यापेक्षा आपल्या शरीरातील अनमोल असे नेत्र दुसऱ्या च उपयोगी पडणार आहेत त्यासाठी नेत्रदान करा व आपल्या मृत्यूनंतर ही मृत्युंजय बना आजच जवळच्या नेत्र पिढीशी संपर्क साधा व नेत्रदानाचा संकल्प करा हजारो अंध व्यक्ती आज नेत्रदानाच्या प्रतीक्षेत असो तुमच्या एका मरणोत्तर नेत्रदानामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाशाची नवीन पहाट होणार आहे याची कुठलीही खरेदी किंवा विक्री होत नाही यावर संपूर्ण शासनाचे नियंत्रण  असते शिर्डी साईबाबा संस्थान येथे देखील आय बँक आय रिटर्व्हल सेंटर व कॅरेटोप्लास्टी सेंटर सुरू झाले असून सर्व शस्त्रक्रिया येथे मोफत केल्या जातात तरी नेत्रदान करण्यासाठी व नेत्र बुबुळ संबंधित सर्व ऑपरेशन साठी खालील नंबर वर संपर्क साधावा 7972677781 डॉक्टर अशोक गावित्रे नेत्रदान अवयव दान व देहदान समुपदेशक

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!