banner ads

अनुदानित बियाण्याचे वाटप सुरू

kopargaonsamachar
0

 अनुदानित बियाण्याचे वाटप सुरू


पीक प्रात्यक्षिकासाठीही शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करण्याचे  आ. काळे यांचे आवाहन 


 कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )


 - कोपरगाव तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी अनुदानित बियाणे मिळावीत यासाठी महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरलेले होते. त्या पात्र शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने अनुदानित बियाण्याचे वाटप सुरू करण्यात आले असून लाभधारक शेतकऱ्यांनी अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्रमाणित अनुदानित बियाणे शंभर टक्के अनुदानावर मोफत दिले जातात. शेतकऱ्यांना आवश्यक असलेली बियाणे मोफत उपलब्ध व्हावीत यासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी अर्ज करणे गरजेचे आहे. त्यानुसार कृषी विभागाने निर्देशित केलेल्या महाडीबीटी पोर्टल या संकेतस्थळावर शेतकऱ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात आले होते. यापैकी अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना एकूण ५० लाख रुपयांचे प्रमाणित केलेले अनुदानित बियाणे कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून या बियाणांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. यामध्ये ३३५ क्विंटल फुले दूर्वा या वाणाचे सोयाबीन बियाणे उपलब्ध असून हे बियाणे शेतकऱ्यांना
मौनगिरी कृषी दीपक कृषी सेवा केंद्र कोपरगाव, कोपरगाव खरेदी विक्री संघ कोपरगाव, कृषीधन कृषी सेवा केंद्र कोपरगाव व मंजूर प्रगत विविध कार्यकारी सेवा सोसायटी मंजूर या ठिकाणी मोफत बियाणे उपलब्ध आहे. या कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांनी आपली बियाणे कृषी विभागाच्या आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून आपले नोंदविलेले बियाणे घ्यावीत.

तसेच राज्य शासनाच्या वतीने कृषी गटासाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये १७० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिक, ४० हेक्टर क्षेत्रावर तुर व सोयाबीन तसेच २० हेक्टर क्षेत्रावर भुईमूग पिकासाठी पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी शेतकरी गटांनी देखील आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर दाखल करावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!