banner ads

शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा शिक्षण मंञ्यांच्या घरावर थाळी नाद

kopargaonsamachar
0

 शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा  शिक्षण मंञ्यांच्या  घरावर थाळी नाद 

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 शालेय पोषण आहार कर्मचारी यांना हरियाणा राज्य सरकारच्या धर्तीवर ७ हजार रुपये वेतन मिळावे,५ जुलै २०२४ च्या मंत्रीमंडळ निर्णयाची अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसह  मालेगाव येथे शालेय पोषण आहार कर्मचारी यांनी थाळी नाद मोर्चा काढला होता. या मोर्चाचे आयोजन सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना,आधारवड महिला बहुउद्देशीय महिला संघटना व आयटक  यांनी केले होते.
सदर मोर्चाची सुरुवात महात्मा फुले चौक मौसम पूल येथुन सुरू झाला.त्याचा शेवट शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यालयात झाला.याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन त्या तात्काळ सोडविण्याचे सांगितले.यावेळी श्रमिक मजदुर संघाच्या राज्य समन्वयक तथा अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षा सौ सविता विधाते,राज्य समन्वयक सुभाष सोनवणे,राज्य समन्वयक कैलास पवार,राज्य समन्वयक उत्तम गायकवाड,आधारवड महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा संगीता सोनवणे, आयटक अमरावती जिल्हा अध्यक्ष हिम्मत गवई यासह अनेक पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अहिल्यानगर कोषाध्यक्ष कुमारी मेजबिन सय्यद,सुभाष सोनवणे,उत्तम गायकवाड,कैलास पवार,शिवकन्या गिरमकर,,संगीता सोनवणे,हिम्मत गवई आदी मोर्चाला मार्गदर्शन केले. शासनाने तात्काळ आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला न्याय द्यावा अन्यथा मंत्रालयावर पुन्हा मोर्चा काढू असेही सर्वांनी मनोगतात व्यक्त केले.याप्रसंगी कर्जत तालुका अध्यक्ष सुखदेव कांबळे,शेवगाव तालुका अध्यक्ष शिवकन्या गिरमकर,नेवासा तालुका अध्यक्ष कैलास पवार,कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश पानपाटील व अहिल्यानगर,नाशिक,छत्रपती संभाजी नगर येथील कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!