banner ads

आत्मा मालिक संस्था प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित

kopargaonsamachar
0

 आत्मा मालिक संस्था प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नाशिक या संस्थेच्या वतीने अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेञात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आत्मा मालिक ध्यानपिठ कोकमठाण या संस्थेस नुकताच राष्ट्रीय प्रेरणा गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. अध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेञात काम करणा­या संंस्थासाठी हा पुरस्कार मानाचा व विशेष सन्मानाचा मानला जातो. हा पुरस्कार धर्मदाय सहआयुक्त म.ला. जोगी यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला. 
आत्मा मालिक संस्थेच्या वतीने संस्थेचे मुख्य लेखापाल गोपाल कुलकर्णी यांनी हा पुरस्कार स्विकारला. या वेळी व्यासपिठावर श्री. रामकृष्ण आरोग्य संस्थान नाशिक चे अध्यक्ष स्वामी कंठानंद, धर्मदाय आयुक्त वी.र. सोनुने, धर्मदाय सह आयुक्त म.ला. जोगी इ. मान्यवर उपस्थित होते.
                या पुरस्काराच्या निमित्ताने आत्मा मालिक ध्यानपिठाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हटले की, आत्मा मालिक संस्था शैक्षणिक आरोग्य, सामाजिक, अध्यात्मिक या क्षेञात अनेक वर्षापासून तळमळीने जनसेवेचे कार्य करत आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेवून पुरस्कृत केले याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. सदर पुरस्कार म्हणजे ध्यानपीठातील सर्व कर्मचारी व सर्व घटकांच्या अथक परिश्रमांना आणि समाजासाठी केलेल्या समर्पित सेवेला मिळालेली मान्यता आहे. या पुरस्काराबद्दल त्यांनी कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेविषयी आभार व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!