संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी नियोजन पाहणीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट
राहाता ( प्रतिनिधी )
गोगलगाव (ता. राहाता) येथे पार पडणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी सोहळा व दिंडी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर अहिल्याथनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. आनंद भंडारी यांनी आज गोगलगाव येथे भेट देऊन नियोजनाची पाहणी केली.
या भेटीदरम्यान दिंडी मार्ग, विश्रांतीस्थळे, पाण्याची सोय, आरोग्य सुविधा, स्वच्छता व्यवस्थापन तसेच वाहतूक नियोजन आदी विविध मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजनबद्ध व शिस्तबद्ध व्यवस्थापनावर भर देत भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने सजग राहण्याच्या सूचना दिल्या. या वेळी जिल्हा् परिषदेचे उप मुख्यस कार्यकारी अधिकारी (ग्रा पं) दादाभाऊ गुंजाळ, राहाता पंचायत समितीचे गटविकास अधिकारी .पंडीत वाघेरे, तालुका आरोग्यच अधिकारी डॉ.संजय घोलप, उप अभियंता जि.प.सा.बां. मयूर मुनोत, बाल विकास प्रकल्प अधिकारी रामदास गंभीरे, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व सोहळा समितीचे सदस्य उपस्थित होते.
संत परंपरेचे संवर्धन हे आपले सामूहिक कर्तव्य आहे, असे मत मुख्या कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी व्यक्त करत सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे आवाहन केले.






