आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५' मत्स्य व्यवसायाच्या नव्या युगाची सुरुवात
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
नेस्को केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय फिशरी टेक एक्स्पो २०२५’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून इफको नवी दिल्लीचे संचालक युवानेते विवेक कोल्हे यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेतील मत्स्यपालनाचे महत्त्व अधोरेखित केले.
उद्घाटन सोहळ्याला डॉ. श्रीनाथ के. आर. (महासंचालक, मत्स्य सर्वेक्षण संस्था, भारत सरकार), डॉ. मनोज एम. शर्मा (संस्थापक, मयंक अॅक्वाकल्चर प्रा. लि.), विविध राज्य व केंद्रशासित संस्थांचे अधिकारी, मत्स्यपालक, पत्रकार व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवानेते विवेक कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करताना मी शेतकऱ्यांचा आणि सहकाराचा प्रतिनिधी आहे असे सांगत शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणात मत्स्यपालनाची भूमिका ठळकपणे मांडली.त्यांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाला संधीचे क्षेत्र ठरवत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.सीलिंग ऍक्ट नंतर अल्पभूधारक शेतकरी प्रमाण मोठे आहे.महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकरी अल्पभूधारक असून त्यांना कमी गुंतवणुकीत चांगले उत्पन्न मिळवून देणारा पर्याय म्हणजे मत्स्यपालन.पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आभार विविध योजना व सहकार्याबद्दल व्यक्त केले.
माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पासून आजवर साठ वर्षांची शेती आणि सहकाराची नाळ जोडलेली आहे.संजीवनी मत्स्य संस्थेमार्फत आम्ही मत्स्य शेतीला प्राधान्य दिलेले असून आगामी काळात शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा म्हणून हे पाऊल महत्वाच ठरणार आहे. शेतकरी आत्महत्या,दरडोई उत्पन्न,अल्पभूधारक समस्या यावर उपाय म्हणजे मत्स्य शेती आहे.एकट्या तालुक्यातील प्रायोगिक विचार करता केवळ पन्नास टक्के शेततळ्यांद्वारेच पाच हजार कोटींपर्यंत अर्थकारण शक्य आहे.एकूण संपूर्ण राज्याचा विचार केल्यास मोठ्या अर्थक्रांतीची नांदी हा व्यवसाय ठरणार आहे.
शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी सरकारकडे महत्त्वाच्या मागण्या त्यांनी यावेळी केल्या.प्रामुख्याने PM मत्स्य संपदा योजनेत सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अनुदान वाढवावे.योजनांची माहिती गावपातळीवर पोहचावी.बँक कर्ज प्रक्रियेसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना.निर्यातक्षम माशांची माहिती व मार्केट लिंक.वाहतूक व थंडी साखळी सुविधा विकसित करणे.या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मत्स्य व्यवसायातील तंत्रज्ञान, प्रक्रिया, निर्यात संधी यांची थेट माहिती मिळणार असून नील क्रांतीच्या दिशेने महाराष्ट्र राज्य मजबूत पावले टाकत आहे.स्टॉल नं. B1 येथे संजीवनी मत्स्य संस्थाद्वारे प्रत्यक्ष मार्गदर्शन व सहभाग संधी उपलब्ध झाली आहे.
शासनाने मत्स्यपालनाला शेतीचा दर्जा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.नील क्रांती हे फक्त धोरण नाही, तर जनआंदोलन आहे महाराष्ट्राच्या विकासाची नवयात्रा आपण सर्वजण एकत्रितपणे सुरू करूया असे आवाहन करत विवेक कोल्हे यांनी आपल्या प्रभावी भाषणाचा समारोप केला
ना. नितेश राणे यांचे प्रतिपादन:
महाराष्ट्राला देशातील मत्स्य व्यवसाय क्षेत्रात आघाडीवर आणण्याचे उद्दिष्ट महायुती सरकारने घेतले आहे," असे नमूद करताना त्यांनी सांगितले की, राज्य सरकारने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला असून त्यामुळे या क्षेत्राला अधिक चालना मिळेल.
त्यांनी मत्स्य उद्योगात नवोपक्रम, तंत्रज्ञान आधारित प्रयोग आणि खासगी सहभाग वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
"मत्स्य व्यवसायात नवे प्रयोग आवश्यक असून युवक, महिला आणि सहकारी संस्था यांनी या क्षेत्रात उतरावे, तरच महाराष्ट्र ‘ब्ल्यू रेव्होल्युशन’मध्ये देशात आघाडीवर राहील," असे ते म्हणाले.संजीवनी मत्स्य संस्था आणि युवानेते विवेक कोल्हे यांचे मत्स्य शेतीबद्दल असणारे कामाचे कौतुक करत वेळोवेळी आपल्याला लागणारे सर्व सहकार्य आपण करू व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मंत्री महोदयांनी दिला
त्यांनी मत्स्य उद्योगात नवोपक्रम, तंत्रज्ञान आधारित प्रयोग आणि खासगी सहभाग वाढवण्यावर भर देण्याचे आवाहन केले.
"मत्स्य व्यवसायात नवे प्रयोग आवश्यक असून युवक, महिला आणि सहकारी संस्था यांनी या क्षेत्रात उतरावे, तरच महाराष्ट्र ‘ब्ल्यू रेव्होल्युशन’मध्ये देशात आघाडीवर राहील," असे ते म्हणाले.संजीवनी मत्स्य संस्था आणि युवानेते विवेक कोल्हे यांचे मत्स्य शेतीबद्दल असणारे कामाचे कौतुक करत वेळोवेळी आपल्याला लागणारे सर्व सहकार्य आपण करू व मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मंत्री महोदयांनी दिला






