banner ads

मायभूमी फाउंडेशनकडून ३१ वटवृक्षांची सामूहिक लागवड

kopargaonsamachar
0

 मायभूमी फाउंडेशनकडून ३१ वटवृक्षांची सामूहिक लागवड


चासनळी परिसरात पर्यावरण रक्षणासाठी नवा उपक्रम, ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 चासनळी येथील निस्वार्थ सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मायभूमी सोशल फाउंडेशनच्या वतीने यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येत गावाच्या हृदयस्थानी ३१ वटवृक्षांची लागवड करत पर्यावरण रक्षणाचा नवा आदर्श घालून दिला.

     स्वच्छता, मंदिर परिसर आणि नदी साफसफाईसारख्या उपक्रमांमध्ये सातत्याने अग्रेसर असलेल्या या संस्थेने यावर्षी फक्त ‘शुभेच्छा’ पुरता दिन साजरा न करता प्रत्यक्ष झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला.
फाउंडेशनतर्फे या ३१ वटवृक्षांच्या संवर्धनाचीही जबाबदारी उचलण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या सर्व वटवृक्षांना कुंपण जाळ्यांची सोय करण्यात आली असून, ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहकार्य केले. काही सहकारी संस्था आणि नागरिकांनी या उपक्रमासाठी आर्थिक मदतही केली. कार्यक्रमात मायभूमी फाउंडेशनचे सर्व सदस्य, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

" केवळ परिसराची स्वच्छता ही जबाबदारी नव्हे, तर भविष्यासाठी हरित वारसा जपणे ही आजची गरज आहे. मायभूमी सामाजिक संस्थेमुळे गेल्या काही वर्षांत परिसरात खूप मोठा बदल जाणवतो आहे. इथले तरुण सामाजिक भान राखून आदर्श घडवत आहेत."
- सोमनाथ चांदगुडे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!