banner ads

कोपरगाव पोस्ट कार्यालयाचे कामकाज ग्राहक सेवेत सर्वोत्कृष्ट_ कैलास ठोळे

kopargaonsamachar
0

 कोपरगाव पोस्ट कार्यालयाचे कामकाज ग्राहक सेवेत सर्वोत्कृष्ट_ कैलास ठोळे 


 कोपरगाव ( लक्ष्मण  वावरे )               
      पोस्ट ग्राहकाशी उत्कृष्ट समन्वय, ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्यात तसेच पोस्टाच्या सर्व नेट अकाउंट योजना मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात श्रीरामपूर विभागामध्ये कोपरगाव पोस्ट कार्यालय गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकावर होते ही बाब कोपरगावकरांच्या दृष्टीने शिरपेचात तुरा खोवणारी असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक कैलास ठोळे यांनी केले.

         जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून कोपरगाव पोस्ट कार्यालय व कोकमठाण गोकुळधाम गौरक्षा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पोस्ट कार्यालयाच्या इतिहासात प्रथमच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. या शिबिरास कोपरगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती नाशिक यांच्यावतीने सुमारे ७२ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले.

            प्रारंभी प्रसिद्ध उद्योजक व आर्थिक तज्ज्ञ कैलास ठोळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळधाम गोरक्ष केंद्राचे अध्यक्ष प्रवीण पाटणी होते.श्रीरामपूर डाक विभागाचे अध्यक्ष उमेश जनवाडे यांनी रक्तदानाचे औचित्य साधत पोस्ट खात्याच्या आधुनिक सेवेची माहिती दिली.
        पोस्ट खात्यात सध्या सुरु असलेला नेट बँकिंग चा आमूलाग्र बदल ही नव्या युगाची नांदी, तसेच क्रांती असून येणारा काळ हा पोस्ट खात्यासाठी सुवर्णकाळ ठरणारा असेल.पोस्टाच्या विविध योजना खातेदार ग्राहकांपर्यंत पोहोचवून विश्वास निर्माण करणारे कर्मचारी हे खऱ्या अर्थाने या बदलाचे शिल्पकार आहेत. नेट बँकिंग मुळे आता देशभरातील सर्व पोस्ट कार्यालय एकमेकांना जोडले जाणार आहेत अशी सेवा घरोघरी जाऊन देणारे पोस्ट कर्मचारी एकमेव आहेत. याही वर्षी कोपरगाव कार्यालयाचा प्रथम क्रमांक यावा अशी अपेक्षाही  कैलास ठोळे यांनी व्यक्त केली.
            या वेळी कोपरगाव डाक विभागाचे डाकनिरीक्षक अनंत सोनवणे, अमित लोहाडे आदी उपस्थित होते.
            या शिबिरात जनकल्याण रक्त पिढीचे डॉ. दीपक कुमार, संजय कुलकर्णी, नयन गोसावी, केशव गोडसे, साईनाथ शेलार, अरुण कुलकर्णी, वाल्मीक वाळुंज, उमेश गांधले, कीर्ती देसाई, सौ. रत्नमाला वाघमारे, डाक आवेक्षक संजय ढेपले, अर्जुन मोरे,ॲड. साईप्रसाद डोके, बापूसाहेब चव्हाण,विजय जोर्वेकर, सोमनाथ तांगतोडे, अशोक अनाप, कैलास हाडोळे, ज्ञानदेव पगारे,गौरव वाघ, विशाल गवळी,तसेच कोपरगाव सब डाक विभागातील सर्व पोस्ट कर्मचारी, पोस्टमन, ब्रांच पोस्टमास्तर यांनी सक्रिय सहभाग घेतला. अमित जैन यांनी आभार मानले.
 


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!