banner ads

नाटेगांवच्या सरपंचपदी गणेश मोरे यांची निवड.

kopargaonsamachar
0

 नाटेगांवच्या सरपंचपदी गणेश मोरे यांची निवड.


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

             तालुक्यातील नाटेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कोल्हे गटाचे गणेश आप्पासाहेब मोरे यांची बिनविरोध निवड झाली.निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मच्छिंद्र पोकळे व सहायक म्हणुन ग्रामसेवक सिध्दार्थ काळे यांनी काम पाहिले,  गणेश मोरे यांच्या नावाची सुचना जयवंत बाबासाहेब मोरे यांनी केली.

नवनिर्वाचित सरपंच गणेश आप्पासाहेब मोरे यांचा यावेळी सत्कार करण्यांत आला. सत्कारास उत्तर देतांना ते म्हणाले की, युवानेते विवेक  कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली नाटेगांव ग्रामपंचायत अंतर्गत विविध जनविकासाच्या योजना राबवुन गांवचा कारभार आदर्श करण्यांवर भर देऊ.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्वश्री. त्रंबकराव सरोदे, कोपरगांव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, डी. पी. मोरे, रामदास मोरे, डॉ गोरक्षनाथ मोरे, राजेंद्र मोरे, नारायण मोरे, आप्पासाहेब मोरे, दगु मोरे, रामनाथ मोरे, शरद मोरे, बाबासाहेब मोरे, जयराम मोरे, ताराचंद मोरे, दत्तात्रय मोरे, गोरख मोरे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी ग्रामसेवक सिध्दार्थ काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.  नूतन सरपंच गणेश  मोरे यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!