banner ads

" नाटेगावातील घरकुल लाभार्थ्यांना माती मिश्रीत वाळू "

kopargaonsamachar
0

 " नाटेगावातील घरकुल लाभार्थ्यांना  माती मिश्रीत वाळू "


    (कुंभारी  शासकीय वाळू डेपोत अनागोंदी कारभार )
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 कोपरगाव  येथील महसूल विभागा मार्फत घरकुल बांधकामासाठी पुरविण्यात येणार्‍या वाळूच्या नावाखाली लाभार्थ्यांची लूट होत असून त्यांना माती व दगडं मिश्रीत निकृष्ट दर्जाची वाळू पुरविण्यात येत आहे.कोपरगावच्या तहसिलदारांनी नाटेगाव येथे घरकुल धारकांना टाकलेल्या शासकीय वाळूची समक्ष पाहणी करुन चांगल्या दर्जाची वाळू टाकावी अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.

घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी नाममात्र दरात शासनाच्या अधिकृत वाळू डेपोमधून वाळू देण्याची योजना महसूल विभागातर्फे राबविण्यात येत आहे. कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव   येथील घरकुल लाभार्थी सोमनाथ तात्याबा मोरे यांनी  शासनाच्या योजनेतून मंजूर झालेल्या घरकुल बांधकामासाठी वाळू मिळावी म्हणून आभासी अर्ज केला. त्यानंतर सोमनाथ मोरे यांचा मागणी अर्ज मंजूर करून कुंभारी येथील रेती वितरण डेपो मधून जवळपास २.५० ब्रास रेती उपलब्ध करून देण्यात आली.  त्याचे त्यांनी ७ हजार रुपये व वाळू डेपोतुन गाडीत वाळू भरण्याच्या नावाखाली चारशे रुपये घेण्यात आले

वाळूसाठा घरी पोहोचल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे मोरे यांच्या लक्षात आले. नाटेगाव येथे सोमनाथ मोरे यांच्या व्यतीरीक्त अजुन तीन घरकुल धारकांनाही माती मिश्रीत वाळू टाकण्यात आली.
वाळू डेपो मध्ये चांगल्या  वाळुचा ढीग दिसतो मग घरकूल लाभार्थ्यांना टाकण्यात येत असलेली ८० टक्के माती व फक्त २० टक्के वाळू येते कोठून याचे गौडबंगाल काय? असा संतप्त सवाल घरकुल धारकांनी केला आहे.
कोपरगाव  तालुक्यात अशा अनेक लाभार्थ्यांना अशाच प्रकारची वाळू शासकीय वाळू डेपोमधून ? सर्रास वितरित केली जात आहे. दगडं व मातीमिश्रीत वाळूसाठा लाभार्थ्यांना पुरविण्यात येतो. यानंतर कंटाळून हे लाभार्थी खुल्या बाजारातून चढ्या भावाने वाळू खरेदी करूनच आपले बांधकाम पूर्ण करताना दिसून येत आहे.

 [ गरीबांचे घरकुल बनले मोठ्यांचे पोटभरण्याचे साधन --
गोरगरीब सर्वसामान्य नागरिक आपले घराचे स्वप्न पूर्ण  करण्यासाठी शासकीय घरकुल चांगल्या दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न करतात माञ शासनाची चांगल्या दर्जाची वाळू  मिळेल या आशेवर पाणी फेरले असुन वाळू डेपोतून घरकुलांच्या नावाखाली उचललेली वाळू नेमकी जाते कोठे ?  टाकलेल्या  या निकृष्ट दर्जाच्या वाळूने गरीबांचे घरकुल मोठ्यांचे पोटभरण्याचे साधन झाल्याचे चिञ कोपरगाव तालुक्यात पहावयास मिळत असुन यांची दखल  लोकप्रतिनिधीनी घ्यावी असी मागणी  घरकुल धारकांनी केली आहे.]

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!