banner ads

कर्मचा-यांना आपत्तीजन्य परिस्थितीत प्रथमोचाराचे प्रशिक्षण

kopargaonsamachar
0

 कर्मचा-यांना आपत्तीजन्य परिस्थितीत प्रथमोचाराचे प्रशिक्षण


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )

           आपत्तीजन्य परिस्थितीत एखादी दुर्दैवी घटना घडली, कामगार अचानक चक्कर येवुन पडला, अपघातात जखमी झाला, गंभीर भाजले, वायु गळती अशावेळी अपघातग्रस्तास दवाखान्यापर्यंत नेण्याच्या अगोदर त्याचा जीव वाचविण्यासाठी प्रथमोपचार म्हणून काय करावयास पाहिजे याबाबतचे प्रशिक्षण सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा-यांना मुंबई येथील वैद्यकिय क्षेत्रातील तज्ञ डॉ. अजय सावंत यांनी  दिले.

             प्रारंभी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यांत आले. प्रभारी कार्यकारी संचालक तथा साखर सर व्यवस्थापक शिवाजीराव दिवटे प्रास्तविक करतांना म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कारखान्याच्या सभासद शेतक-यांसह कामगारांच्या सुरक्षेला सर्वोच्य प्राधान्य दिले असुन त्याबाबतच्या सर्व अत्याधुनिक सुविधा कारखाना कार्यस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कारखान्यांत एखादा अपघात झाला तर आपण सर्वचजण गोंधळून जातो अशा परिस्थितीत नेमकं काय करावे याचे प्रात्याक्षिकासह माहिती तज्ञांकरवी व्यवस्थापनाच्यावतीने  सातत्यांने देण्यांत येत असते, युवानेते विवेक  कोल्हे यांनी कित्येकवेळा अपघातग्रस्तांना वेळेत मदत पुरवून अनेकांचे प्राण वाचविलेले आहेत. व्यवस्थापकीय व्यवस्थापक प्रकाश डुंबरे यांनी आपत्ती पथक, सुरक्षाजन्य सुविधा आदिंची माहिती दिली. सेफ्टी ऑफिसर सलमान शेख यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याच्यावतीने डॉ. अजय सावंत यांचा सत्कार करण्यांत आला.
डॉ. अजय सावंत पुढे म्हणाले की, अपघातात जखमी झालेल्या कामगाराला अगोदर प्रथमोचार दिले पाहिजे, त्यातुन त्याच्या जीवीतावरील संकट काही प्रमाणांत कमी होते. याप्रसंगी डॉ सावंत यांनी विविध आपत्तीजन्य परिस्थितीत प्रथमोचारासाठी नेमके काय केले पाहिजे याचे सचित्र मार्गदर्शन देत शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण प्रथमोचाराची माहिती घेतली तर निश्चितच एखाद्याचे प्राण वाचवु शकतो असे सांगुन ते पुढे म्हणाले की, ब-याचवेळा घटना घडल्यानंतर अनेकजण गोंधळुन जातात, गर्दी करतात अशावेळी सर्वप्रथम अपघातग्रस्तास प्राणवायु कसा मिळेल, त्याचा रक्तस्वाव होत असेल तर तो थांबविला पाहिजे, श्वासनलिकेत अन्न अडकले तर तात्काळ प्रथमोपचार करून त्याची याची काळजी घेतली पाहिजे, दवाखान्यात नेण्यापुर्वी जागेवर प्रथमोचाराच्या मदतीन अपघातग्रस्ताचे प्राण वाचविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे. यावेळी एच आर मॅनेजर विशाल वाजपेयी उपस्थित होते.शेवटी कारखान्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एम. एच. बत्रा यांनी आभार मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!