banner ads

शीर्षक नाही

kopargaonsamachar
0

 

 जी. बी. शिंदे श्री गणेश कारखान्याचे नवे एम.डी

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक (एम.डी.) पदावर श्री जी. बी. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक व युवानेते  विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील कार्यभारही सोपविण्यात आला.
संजीवनी उद्योग समूहाचे प्रमुख शेतकी अधिकारी म्हणून कार्यरत असताना शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी व कार्यक्षम भूमिका बजावली आहे. त्यांची कामाची हातोटी, तंत्रज्ञानाशी सुसंगत दृष्टीकोन आणि युवानेते विवेक कोल्हे यांचे मार्गदर्शन यामुळेच श्री गणेश कारखान्याच्या व्यवस्थापनासाठी ही नियुक्ती अत्यंत मोलाची ठरत आहे
श्री शिंदे यांना माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे विचार, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि मा.आ.स्नेहलता कोल्हे यांचे वेळोवेळी लाभलेले मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे. आज विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली ते नवनवीन यशोशिखर गाठत आहेत. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संपूर्ण गणेश परिसरातून, सहकार क्षेत्रातून आणि शेतकरी वर्गाकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

या प्रसंगी श्री गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीरराव लहारे, व्हा. चेअरमन विजयराव दंडवते, जेष्ठ संचालक नारायणराव कार्ले, सर्व संचालक मंडळ, कोल्हे कारखान्याचे जनरल मॅनेजर शिवाजीराव दिवटे, थोरात कारखान्याचे एम.डी. घुगरकर  आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकाराच्या दृष्टीने आणि गणेश परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश कारखाना हे एक महत्वाचे केंद्रबिंदू ठरत आहे. मागील दोन हंगामांमध्ये उत्तम गाळप झाल्यामुळे कारखान्याची विश्वासार्हता आणि कामगिरी या दोन्ही बाबतीत वाढ झाली असून, शिंदे यांची नियुक्ती या विकास प्रवासाला नवे बळ देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!