banner ads

वीज कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा संपन्न.

kopargaonsamachar
0

 वीज कर्मचारी पतसंस्थेची वार्षिक सभा  संपन्न.

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 वीज कर्मचाऱ्यांची कामधेनु असलेली हक्काची सहकार सावली म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाणारी वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्या. बाभळेश्वर या संस्थेची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शिवकांता लॉन्स, लोणी बाभळेश्वर या ठिकाणी संस्थेचे चेअरमन पूनमचंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली  सभासद,  स्वाभिमानी नियोजन समिती, स्वाभिमानी तांत्रिक मंडळ, स्वाभिमानी मार्गदर्शक मंडळ यांच्या उपस्थितीने विश्वासाने व मार्गदर्शनाने  अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडली.
या सभेमध्ये संस्थेचे सभासद असलेले व या वर्षी वीज क्षेत्रातून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यांचा संस्थेकडून सपत्नीक सत्कार  करण्यात आला, तसेच निसर्गाचे संवर्धन व्हावे या दृष्टीने प्रत्येकांना एक एक आंब्याचे रोपटे भेट म्हणून देण्यात आले.संस्थेच्या सभासदांच्या पाल्यांना  प्रोत्साहन मिळावे म्हणून संस्थेकडून शालेय बक्षीस योजनेअंतर्गत स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले, यावेळी स्वतंत्र बहुजन वीज कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस जालिंदर पांढरे तसेच तांत्रिक कामगार युनियन ५०५९ केंद्रीय उपाध्यक्ष सतीश भुजबळ यांनी मोलाचे दिशादर्शक मार्गदर्शन केले यावेळी अनिल शिरसाट यांनीही संस्थे विषयी मोलाचे मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन गायत्री म्हस्के  यांनी केले तर आभार संचालक पांडुरंग पोटे यांनी मानले यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन शरद काकडे, मानद सचिव सचिन आरणे तसेच तज्ञ संचालक आत्माराम देशमुख संचालक अर्जुन झनान,एकनाथ शिंदे,श्रीराम वाकचौरे, हरि बुळे, महेश बनकर, सिताराम खंडागळे, मयूर अष्टेकर, रविकिरण कानडे, विजयकुमार डहाळे,अमोल पठारे, सुनील खंडागळे,महिला संचालिका सोनाली परसे तसेच कर्मचारीवृंद नागरे सोमनाथ, संजय करपे, दत्तात्रय शेळके, गिरीश कुऱ्हे, पुष्कर दहिफळे, विकास गवारे यांच्यासह असंख्य सभासद बांधव महिला सदस्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!