banner ads

अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार – आ. आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आ. आशुतोष काळे


कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहराच्या जवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या महामार्गाचे काम रखडले आहे. शिवाय सबंधित ठेकेदार कोणत्याही प्रकारचे नियोजन करता अत्यंत धीम्या गतीने काम करीत आहे. त्यामुळे वाहतुकीला येत असलेला अडथळा व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सुरु असलेले सावळी विहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याचे काम योग्य नियोजन करून कामाला गती द्या. अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी दिला आहे.

 राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या महामार्गावरील कोपरगांव सावळीविहीर रस्त्याचे कामासाठी आ.आशुतोष काळे यांनी १९१ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. परंतु या महामार्गाचे काम सुरु झाल्यापासून आजतागायत या महामार्गाचे काम संबंधित ठेकेदार अत्यंत संथ गतीने करीत असल्यामुळे सदर कामाची मुदत संपली असतांना देखील या महामार्गाचे काम पूर्ण होवू शकले नाही. तसेच काम करीत असतांना नियोजनाचा अभाव असल्यामुळे या महामार्गावर रहदारीला येणाऱ्या अडथळ्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले असून नागरीकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करतांना नागरीकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कोपरगांव मतदार संघात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेला पाऊस व या महामार्गावर असलेले तिर्थक्षेत्र, महाविद्यालय, तसेच मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे होत असल्यामुळे रहदारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. संबंधित ठेकेदाराने योग्य नियोजन न करता सर्व्हिस रोड पूर्ण करण्यापूर्वीच उड्डाण पुलाचे काम हाती घेतल्यामुळे रहदारीच्या अडचणी अधिक  प्रमाणात वाढल्या असून रहदारीस वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. परिणामी वेळोवेळी रहदारी थांबली जावून त्याचा फटका अत्यवस्थ रुग्णाला रुग्णालयात घेवून जाणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील बसत असून त्यामुळे वेळप्रसंगी रुग्णांचा जिव जाण्याचा धोका देखील नाकारता येवू शकत  नाही. या सर्व बाबी गंभीर असून अपघाताचे प्रमाण वाढून जीवित हानी देखील होत आहे.
परंतु याबाबत सबंधित ठेकेदार आणि अधिकारी देखील गंभीर नसून ठेकेदाराची कामाची मुदत संपलेली असतांना देखील अद्याप कामात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे सुरु असलेले सावळी विहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याचे काम योग्य नियोजन करून लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा ईशारा आ.आशुतोष काळे यांनी दिला आहे.

         

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!