banner ads

श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या नवनियुक्त कार्यकारिणीचा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार

kopargaonsamachar
0

 श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या  नवनियुक्त कार्यकारिणीचा  कोल्हे यांच्या हस्ते सत्कार


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

श्री गणेश विद्या प्रसारक मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सहा विद्यालयांच्या स्थानिक स्कूल कमिटी कार्यकारणीवर पदाधिकारी आणि सदस्य नियुक्त करण्यात आलेले असून, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि संस्था उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

श्रीमती नादरबाई आनंदराव देशमुख माध्यमिक विद्यालयात अध्यक्षपदी अभिजीत देशमुख, उपाध्यक्षपदी सचिन वाबळे यांची निवड झाली आहे. राजमाता जिजाऊ माध्यमिक विद्यालय, गणेशनगर येथील समितीचे अध्यक्ष जनार्दन गाढवे तर उपाध्यक्ष राजेंद्र गाढवे आहेत. लक्ष्मीनारायण माध्यमिक विद्यालय, वाकडी येथील अध्यक्ष नवनाथ शेळके व उपाध्यक्ष डॉ. वसंतराव लबडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

जय हनुमान माध्यमिक विद्यालय, रांजणगाव देशमुख येथे अध्यक्ष म्हणून प्रकाश गोर्डे व उपाध्यक्ष अरुण वर्पे यांची निवड झाली. श्री ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, केलवड येथील अध्यक्ष सुरेश गमे व उपाध्यक्ष विठोबा राऊत यांच्यावर कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, श्री छत्रपती शंभूराजे माध्यमिक विद्यालय, पिंपळवाडी येथे अध्यक्ष वाल्मीक तुरकणे व उपाध्यक्ष गणपतराव धरम यांची निवड झाली आहे.

या सर्व समित्यांना येत्या काळात शाळांच्या कार्यवाहीसाठी आणि शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावावी. पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत रहावे, आणि अधिकाधिक क्षेत्रात श्री गणेश विद्याप्रसारक कसे अग्रस्थानी आपले नावलौकिक करेल यासाठी प्रभावी उपक्रम हाती घ्यावे अशी अपेक्षा नवनियुक्त पदाधिकारी आणि समित्यांतील सदस्यांकडून विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली.यावेळी श्री गणेश कारखाना चेअरमन सुधीरराव लहारे, व्हा.चेअरमन विजयराव दंडवते आणि सर्व संचालक मंडळ तसेच श्री गणेश विद्या प्रसारक मंडळातील पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते
.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!