banner ads

आ. आशुतोष काळेंची राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी निवड

kopargaonsamachar
0

 आ. आशुतोष काळेंची राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी निवड


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
- राज्याचे सुधारित युवा धोरण ठरविण्यासाठी क्रीडा व युवक कल्याण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेल्या राज्याच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी आ. आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली आहे.  
महायुती शासनाने राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली युवा धोरण समिती स्थापन केली आहे. यामध्ये उच्च शिक्षित, युवा नेतृत्व व राज्यात आपल्या विकास कामांच्या कामगिरीच्या जोरावर सर्वाधिक मताधिक्यात क्रमांक पाच ने निवडून आलेल्या आ. आशुतोष काळे यांना स्थान देण्यात आले आहे.काही महिन्यापूर्वीच आ. आशुतोष काळे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या 'मराठी भाषा समितीच्या' अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा राज्याच्या अत्यंत महत्वाच्या असलेल्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देतांना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की,  महाराष्ट्र राज्याच्या युवा धोरण समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याचा मला अत्यंत आनंद व अभिमान वाटतो. ही निवड म्हणजे केवळ एक पद नाही, तर राज्यातील लाखो तरुणांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी जबाबदारी आहे.आजचा युवक हा केवळ देशाचे भविष्य नाही, तर वर्तमानातील शक्ती आहे. युवकांच्या शिक्षण, रोजगार, कौशल्यविकास, मानसिक आरोग्य आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी ठोस पावले उचलणं ही आमची प्राथमिकता राहील व या धोरणाद्वारे युवकांसाठी नवे दरवाजे खुले होवून त्यांच्या उर्जेला योग्य दिशा मिळेल. शहरात असो की ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक तरुणाला समान संधी मिळाली पाहिजे. ‘स्वप्न पाहणारा’ युवक, ‘स्वप्न साकार करणारा’ झाला पाहिजे  हाच आमचा हेतू आहे. त्यासाठी शासन, शिक्षणसंस्था, उद्योगजगत आणि स्वयंसेवी संस्था यांचं सशक्त समन्वय साधण्याचा प्रयत्न राहील.युवकांसाठीचे धोरण त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे ठरावे, यासाठी मी सदैव कटिबद्ध राहील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे. आपल्या निवडीबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांचे आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!