banner ads

सुरक्षा रक्षकांचे पगाराचे पैसे खाऊन ठेकेदार हात पुसून मोकळा

kopargaonsamachar
0

 सुरक्षा रक्षकांचे पगाराचे पैसे खाऊन ठेकेदार हात पुसून मोकळा 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने खाजगी तत्वावर काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचे तब्बल दोन महिन्यांचे वेतन महाविद्यालयाने नेमलेल्या ठेकेदाराने बुडवल्याने या सुरक्षा रक्षकांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी ठेकेदाराकडे वेतनाची मागणी केली असता ठेकेदार सुरवातीला उडवाउडवीची उत्तर देत होता . मात्र आता तर 'पैसे देत नाही काय करायचे करून घ्या' असे म्हणत कर्मचाऱ्यांनाच दमदाटी करीत असल्याचे कर्मचारी सांगत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की महाविद्यालयाचे व्यवस्थापन महाविद्यालयाच्या सुरक्षेसाठी खाजगी तत्वावर सुरक्षा रक्षक नेमत असते. त्याकरिता वेगवेगळ्या सुरक्षा ठेकेदार एजन्सीजना ठेका दिला जातो. याच पद्धतीने महाविद्यालयाने एका माजी नगर सेवकाच्या सुरक्षा एजन्सीला ठेका दिला होता. सदर ठेकेदाराने नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी महाविद्याकडून रक्कम उचलली मात्र संबधित कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन दिलेच नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. यामध्ये धनराज जानराव , पांडुरंग देवरे ,पंढरीनाथ शिंदे ,मयूर आव्हाड ,दीपक आरणे ,हेमंत जगताप,परसराम रोकडे ,किरण भोजने,वाल्मिक सोनावणे,शिवाजी वाघ या सर्व कार्मच्र्यांचे मिळून तब्बल एक लाख तीस हजार रुपये या ठेकेदाराने थकविले आहे.
याबाबत या सुरक्षा रक्षकांनी महाविद्यालयाकडे तक्रार केली असता महाविद्यालय व्यवस्थापनाने सरळ कानावर हात ठेवत आम्ही ठेकेदाराला पैसे दिले आहेत . आमचा तुमचा काहीही संबंध नाही म्हणत जबाबदारी टाळत हात झटकले आहे. संबधित ठेकेदार हा लोकप्रतिनिधींच्या गटाचा माजी नगरसेवक असल्याने लोकप्रतिनिधींकडे याबाबत तक्रार केली . मात्र त्याचाही काहीही उपयोग झाला नसल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

मर्जीतील ठेकेदार आणि कष्टकऱ्यांची पिळवणूक  

सदर महाविद्यालय जरी रयत शिक्षण संस्थेचे असले तरी सुरक्षा रक्षणाचा ठेका हा राजकीय नेत्यांच्या मर्जीतील व्यक्तींनाच दिला जातो . हे ठेकेदारही महाविद्यालयाकडून प्रती व्यक्ती १२ - १३ हजार रुपये घेतात आणि कर्मचाऱ्यांना ८ ते १० हजार रुपये प्रती महिना वेतन देतात तेही १२ तासाची दिवस व रात्रीची ड्युटी करून . हे वेतन म्हणजे शासनाच्या किमान वेतन धोरणाचीही पायमल्ली ठरू शकते. हि सरळ सरळ लुबाडणूक असूनही महाविद्यालय प्रशासन हेतुपुरस्पर याकडे डोळेझाक करत आहे. या कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा देण्याची तसदी ठेकेदार किंवा महाविद्यालय घेताना दिसत नाही. अंगावरील सुरक्षा रक्षकाचा गणवेश आणि बूट सुद्धा कर्मचाऱ्यांना स्व खर्चाने विकत घ्यावे लागतात
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!