कोपरगावात लाखोचा दरोडा चोरीचा थरार सी.सी.टिव्ही कॕमेरात कैद
पोलिसांचा धाक कमी झाला ?
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले सचिन लोहाडे , अमित लोहाडे यांच्या नामांकित सचिन वाच हे घड्याळाचे दुकान फोडून आज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागड्या किमतीचे घड्याळ रोख रक्कम चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी पहाटे ३ ते ३.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
या घटनेबाबत अमित लोहाडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की महागड्या किमतीचे घड्याळ रोख रक्कम असा एकूण ६० ते ७० लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे
या घटनेने शहरासह तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत पंचनामां करत सीसीटीव्हीच्या आधारे चोरांचा शोध घेत आहे
दरम्यान कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे. कोपरगाव शहराच्या विविध उपनगरात धाडसी चोऱ्या, घरफोड्या होत आहे. परंतु शहराच्या मध्यवर्ती ठिकाणीच धाडसी चोरी झाल्याने चर्चेला उधाण आले असून आश्चर्य व्यक्त होत आहेत कारण सदर ठिकाणी मुख्य रस्त्यावर हे दुकान आहेत या दुकानाच्या आजूबाजूला सीसीटिव्हि लावण्यात आले आहेत ५ ते ६ चोरट्यांनी बिनधास्तपणे दुकानाच्या शेटरला चादरीचा आडोसा धरून ३,४ जणांनी शटर वाकवून दुकानात २ जणांनी प्रवेश करत. महागडे घड्याळ अन् रोख रक्कम चोरी करत पाबोरा केला आहेत,, सदर घटनाही सीसीटिव्हि फुटेज मध्ये कैद झाली असून चोरट्यांना जेर बंद करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहेत.शहराच्या मध्यवर्ती ठीकाणी हा दरोडा टाकून शहर पोलिसांना जणू सलामीच दिली असुन पोलिसांचा धाक कमी झाल्याचे यावरुन दिसते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या या जबर चोरीने मोठी खळबळ उडाली असुन मोठी घबराट पसरली आहे.


.jpg)



